19 August, 2025

कृतिसंगमबाबत आवश्यक ते सहकार्य करणार - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

* महिला आर्थिक विकास महामंडळाची जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक संपन्न हिंगोली (जिमाका), दि. 19 : नवतेजस्विनी प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणारे उप प्रकल्प तसेच माविममार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच महिला बचत गट कर्ज, वैयक्तीक उद्योग व्यवसायाचे कर्ज गावपातळीवर विविध यंत्रणाच्या माध्यमातून राबविण्यासाठी कृतीसंगमबाबत आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत आज नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीमध्ये, आरोग्य तपासणी, जाणीव जागृती कार्यक्रम, जिल्हा उद्योग केंद्रा, खादी ग्रामोद्योग, पशुसंवर्धन विभाग, कृषि विभाग, महिला बाल कल्याण विभाग तसेच इतर यंत्रणामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ महिलांना देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. माविम मित्रमंडळ, कायदा साथी, संयुक्त मालकी हक्क उप प्रकल्पासाठी कृती संगम याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. लाडकी बहीण योजनेंतर्गत महिला सहकारी संस्था स्थापनेबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी सल्लागार समितीचे विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. विविध विभाग प्रमुखांनी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. विविध योजनेचे प्रलंबित प्रस्ताव बँकानी तात्काळ निकाली काढावेत-जिल्हाधिकारी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग तसेच विविध योजनेतील प्रलंबित प्रकरणे बँकानी तात्काळ निकाली काढावेत, अशा सूचना संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांना यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. *****

No comments: