01 August, 2025
डीएनटी विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग सीड योजना योजनेचा लाभ घेण्यासाठी लिंकवर माहिती भरावी
हिंगोली (जिमाका), दि. 01: केंद्र शासनाच्या वतीने डीएनटी विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग सीड योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ संबंधित डीएनटी, एनटी व एसएनटी लाभार्थ्यांना मिळण्यासाठी खालीलप्रमाणे पात्रता आहे.
डीएनटी. एनटी व एसएनटी विद्यार्थ्यांसाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे. विद्यार्थी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या कोणत्याही कोचिंग योजनेचा लाभ घेत नसावा. https://www.buddy4study.com/application/FCDNT2/instruction या लिंकवर संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी mosje@buddy4study.com या ई-मेल पत्त्यावर किंवा 08047495118 या नंबरवर फोन करावा, असे आवाहन यादव गायकवाड, सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण हिंगोली यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment