22 August, 2025

खेकड्यांच्या प्रजनन हंगामात खेकडे पकडण्यास बंदी

हिंगोली (जिमाका), दि. 22 : जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाचे तलाव जलाशयात, तसेच नद्यांमध्ये पावसाळी काळात गोड्या पाण्यातील खेकड्यांचे नैसर्गिक प्रजनन मोठ्या प्रमाणावर सुरू होते. प्रजनन काळात गरोदर मादी खेकडे तसेच अंडी व पिल्ले धारण केलेली मासे व खेकडे याची शिकार होत असते. हे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर व हानिकारक आहे. मच्छीमार बांधवांना व मत्स्य सहकारी संस्थांनी पावसाळी हंगामात खेकडे, विशेषतः मादी खेकडे आणि प्रजनन करणारे मासे न पकडणे ही नैतिक जबाबदारी आहे. या काळात खेकड्याचे शिकार टाळल्यास पुढील काळात खेकड्यांचा साठा अधिक प्रमाणात वाढतो. ही जैवविविधतेसाठी आवश्यक असलेली प्रक्रिया आहे. या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील सर्व मच्छीमार व मत्स्य सहकारी संस्थांनी पुढाकार घेवून प्रजनन हंगामात नदीतील मासे व खेकडे यांची शिकार यापासून दूर रहावे व नैसर्गिक संवर्धनास हातभार लावावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी केले आहे. *****

No comments: