17 August, 2025

ग्रामीण रस्ते व पुल तात्काळ पूर्ववत करण्याबाबत तहसीलदाराच्या कार्यकारी अभियंता (बांधकाम) यांना सूचना

हिंगोली, दि.17 (जिमाका) : औंढा नागनाथचे तहसीलदार हरीश गाडे यांनी आज जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता (बांधकाम) यांना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार अतिवृष्टीमुळे झालेल्या रस्त्यांची व पुलांची दुरुस्ती करण्याबाबतच्या सूचना केल्या. त्या अनुषंगाने औंढा नागनाथ तालुक्यात 16 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे काही रस्ते व पुल नादुरुस्त झाले आहेत. वाहतुकीस अयोग्य झाले आहेत. दुरुस्ती न करता या रस्त्याचा वापर केल्यास अपघात होण्याची शक्याता नाकारता येत नाही. त्यामुळे औंढा नागनाथ ते देरगाव, रांजाळा ते वडद, येहळेगाव ते निशाना, असोला तर्फे लाख ते लक्ष्मण नाईक तांडा या गावांचे संपर्क प्रस्थापित करण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी आपल्या अधिनस्त सर्व रस्ते व पुलांचे सर्वेक्षण तात्काळ करुन हे रस्ते व पूल नागरिकांना वापरण्यासाठी पूर्ववत करण्याचे सांगितले आहे. ******

No comments: