16 August, 2025

ईसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सोडणार; नदीकाठच्या गावातील नागरिकांनी पात्रात उतरू नये

हिंगोली, दि.१६ (जिमाका) आज पहाटे तीन वाजल्यापासून ईसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार स्वरुपात पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या वरील बाजूस असलेल्या जयपूर बंधा-याच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यानुषंगाने येणारा येवा लक्षात घेऊन १६ ते ३१ ऑगस्ट २०२५ साठी मंजूर द्वार प्रचालनानुसार धरण पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने अतिरिक्त पाणी ईसापूर धरणाच्या सांडव्याची वक्र द्वारे आज, शनिवार, (दि.१६) रोजी सकाळी ९ वाजता उघडून पैनगंगा नदी पात्रात सोडण्यात येणार आहे.तरी पैनगंगा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी नदी पात्रात न उतरण्याचे आवाहन ईसापूर धरण पूरनियंत्रण कक्षाकडून कळविण्यात आले आहे. *****

No comments: