11 August, 2025

शासकीय योजना तळागाळात पोहचविण्यासाठी केंद्र शासनाच्या मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे मोलाचे योगदान....तहसीलदार हरीश गाडे

*केंद्र सरकारच्या 11 वर्षे सेवापुर्ती, आजादीका अमृतमहोत्सव, हर घर तिरंगा तीन दिवसीय मल्टिमीडिया प्रदर्शनाला सुरुवात..* येथील औंढा नागनाथ मंदिर परिसरातील भक्त निवास क्र. 2 येथे आयोजित प्रदर्शनात शासकीय योजना तळागाळात पोहचविण्यासाठी केंद्र शासनाच्या मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे मोलाचे योगदान ठरत आहे असे औंढा येथील तहसीलदार हरीश गाडे यांनी प्रतिपादन केले. केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरोच्यावतीने आयोजित केंद्र सरकारची 11 वर्षे-सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची, हर घर तिरंगा, आजादी का अमृत महोत्सव या संकल्पनेवर आधारित मल्टी मीडियाच्या चित्रप्रदर्शनच्या उद्घाटन करण्यात आले. पुढे बोलताना तहसीलदार गाडे म्हणाले की मागील 11 वर्षात शासनाने जनसामान्यांच्या विविध योजना राबविल्या आणि त्याचा उपयोग समाजातील विविध घटनांना मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचं जीवनमान उंचावत असून जनतेनेही यामध्ये सहभागी व्हाव. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी ,औंढा नागनाथ संस्‍थानचे प्रशासक तथा तहसिलदार हरिष गाडे,केंद्रीय संचार ब्‍यूरोचे प्रसिद्धी प्रमुख सु‍मि‍त दोडल, पोलिस निरीक्षक जी एस राहिरे,नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव,तालुका आरोग्य अधिकारी गजानन चव्हाण,सद्भाव सेवाभावी संस्थेचे डॉ अभयकुमार भारतीया नागनाथ संस्थांनचे वैजनाथ पवार आणि सुरेंद्र डफळ आदी मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांमध्ये केलेली उल्लेखनीय कामगिरी आणि देशाचा जलदगतीने केलेला विकास तसेच जनतेच्या कल्याणासाठी सरकारकडून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती या प्रदर्शनातून देण्यात येणार आहे. तसेच भारतीय स्वातंत्र्य आणि फाळणी स्‍मृतींवर आधारित चित्रांचा समावेशही असणार आहे. एलईडी वॉलच्या तसेच विविध विभागांच्‍यावतीने शासकीय योजना आणि उपक्रमांची माहिती देण्‍यात येणार आहे. यात जिल्‍हा परिषदेच्‍या आरोग्‍य विभागाच्‍यावतीने मोफत आरोग्‍य तपासणी, एकात्मिक महिला व बालकल्‍याण विभागाचे पोषण आहार पाक कृतीच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.तहसील विभागाच्या वतीने आधार नोंदणीचे, तसेच मुख्यमंत्री सहायता निधी नोंदणी स्टॉल,भारतीय स्‍टेट बॅंकेच्‍यावतीने योजनांची माहिती असलेल्‍या दालन येथे असणार आहे. पर्यावरणामध्ये विशेष उल्लेखनीय कार्य करत असलेल्या सद्भाव सेवाभावी संस्थेचे डॉ. अभयकुमार भरतीया यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. एक झाड आईच्या नावे अभि‍यानातंर्गत वन विभागाच्‍यावतीने आंबा, करंज, जांब, सीताफळ, बांबू , शेवगा आदी पर्यावरणपूरक आणि‍ धार्मिक महत्त्व असलेल्‍या 5 हजार पेक्षा अधिक वृक्षाचे वितरण करण्‍यात आले.. महात्मा फुले आणि डायमंड इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते..सेल्फी बुथ, 360 डिग्री फोटो बुथ या प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहे. या प्रदर्शनास मोठ्या संख्येने नागरिक आणि भाविकांनी भेट दिल्या. हे प्रदर्शन हिंगोली जिल्ह्यातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे सर्वांसाठी मोफत खुले असणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या चित्र प्रदर्शनासाठी नागरिक,विद्यार्थी,भाविक यांना आवाहन केंद्रीय संचार ब्‍यूरो तसेच नागनाथ मंदिर संस्‍थानच्‍यावतीने करण्‍यात आले आहे. *****

No comments: