20 August, 2025

अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूकप्रकरणी जप्त वाहनांचा जाहीर लिलाव

हिंगोली (जिमाका), दि. 20 : अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणात जप्त करण्यात आलेली वाहने हिंगोली तहसील कार्यालयाच्या आवारात लावलेली आहेत. जप्त वाहने सोडविण्याबाबत संबधितांना वारंवार कळविण्यात येऊनही दंडाची रक्कम शासन जमा केलेली नाही. तसेच अवैध वाहतूक करताना वाहन जागेवर सोडून गेलेले वाहन मालकांची वाहने सोडून देण्यासाठी दंडात्मक रक्कम भरण्यासाठी तहसील कार्यालयास आलेले नाहीत. अशी चार वाहने व 9 निर्लेखित ट्रॉली अशा एकूण 13 वाहनांचा जाहीर लिलाव मंगळवार, दिनांक 26 ऑगस्ट, 2025 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय, हिंगोली येथे ठेवण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार, हिंगोली यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. ******

No comments: