22 August, 2025

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

हिंगोली (जिमाका), दि. 22 : राज्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय व येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच हिंगोली जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटनांच्या वतीने हॉकीचे जादूगर मेजर ध्यानंचद यांचा जन्म दिवस दि. 29 ऑगस्ट हा दिवस तालुका क्रीडा संकुल येथे साजरा करावयाचा आहे. या दिवशी मेजर ध्यानंचद यांच्या प्रतिमेचे पूजन करुन हिंगोली जिल्ह्यातील विविध खेळातील राष्ट्रीय खेळाडू व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच या दिवशी सकाळी 10.30 वाजता तालुका क्रीडा संकुलावर खुल्या मॅरेथान व महिला कबडी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषद मैदान हिंगोली येथे शालेय हॉकी क्रीडा स्पर्धा, तर जिल्हा क्रीडा संकुल येथे शालेय कराटे क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडूंनी आपल्या सत्कार सोहळ्यासाठी नामांकने दि. 28 ऑगस्टपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी हिंगोली कार्यालयात सादर करावेत व या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी उपस्थित रहावेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे. *****

No comments: