22 August, 2025

रेल्वे अधिकारी-कर्मचारी यांची एचआयव्ही संवेदीकरण कार्यशाळा संपन्न

हिंगोली (जिमाका), दि. 22 : येथील जिल्हा रुग्णालयातील जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाच्या वतीने हिंगोली रेल्वे स्टेशन येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची एचआयव्ही/एड्स संवेदीकरण कार्यशाळा रेल्वे स्टेशन येथे संपन्न झाली. यावेळी रेल्वे इंजिनिअर श्री. सर्वेश, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डी. एस. चौधरी व रेल्वे विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी समुपदेशक बालाजी चापाकानाडे यांनी एचआयव्ही एड्सबद्दल सखोल माहिती दिली, तर जिल्हा कार्यक्रम अधिकारी डी.एस.चौधरी यांनी 2017 चा एचआयव्ही/एडस् कायदा, जिल्ह्यातील एचआयव्हीची सद्यस्थिती सांगून सर्वांच्या शंकांचे निरसन केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी संजय पवार, आशिष पाटील, टीना कुंदणानी, बालाजी चापाकानडे, इरफान कुरैशी यांनी परिश्रम घेतले. ***

No comments: