21 August, 2025

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त मोटारसायकल रॅली संपन्न

हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय हिंगोली यांच्यामार्फत आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्याच अनुषंगाने आज कै. बाबुराव पाटील महाविद्यालय हिंगोली येथून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीला प्राचार्य डॉ. जयवंत भोयर यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. ही रॅली वाशिम रोडहून शिवाजी चौक मार्गे पोस्ट ऑफीस, जवाहर रोड, गांधी चौक, अग्रसेन चौक अशी शहरातील प्रमुख मार्गावरून निघून सामान्य रुग्णालयात समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये हिंगोली शहरातील कै.बाबुराव पाटील महाविद्यालय, आदर्श महाविद्यालय, शिवाजी महाविद्यालय, पठाडे महाविद्यालय व इतर महाविद्यालयातील प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी होते. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी डी. एस. चौधरी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांना युवा दिनानिमित्त शपथ दिली. यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल पवार, डॉ. डूडूले, गणेश साळुंके व इतर अधिकारी, महाविद्यालयाचे प्रा. डॉ. बलखंडे, प्रा. संभाजी पाटील , प्रा.डॉ. सोनकांबळे, प्रा. भागवत सावके, प्रा. माणिक डोखळे, प्रा.नागनाथ फड, प्रा.कृष्णा इंगळे व इतर प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय पवार, टिना कुंदनानी, आशिष पाटील, बालाजी चाफाकानडे, अब्दुल मुजीब, महानंदा साबळे, स्वाती चोपडे, सुनीता गायकवाड, विनीत उबाळे, बालाजी कदम, रेखा बलखंडे, नम्रता भगत व इतर आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. ***

No comments: