01 August, 2025

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आरोग्य योजनाचा आढावा

• राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन कार्यक्रम अंतर्गत निर्धारित निर्देशांकाची पूर्तता करून केंद्रीय परीक्षणाला सामोरे जाण्यासाठी बैठकीमध्ये ठरविली दिशा हिंगोली: ( दि.१) जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा बैठकीत सविस्तर आढावा घेतला. प्रामुख्याने ११ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा एनकॉसच्या अनुषंगाने यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी स्वतंत्र आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.चक्रधर मुंगल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, डॉ. सुनील देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन राठोड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ प्रशांत पुठावार, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी यांची उपस्थिती होती. या बैठकीत प्रामुख्याने एनकॉस संस्थेचा स्वतंत्र आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन कार्यक्रम अंतर्गत निर्धारित केलेल्या निर्देशांकाची पूर्तता करून केंद्रीय परीक्षणाला सामोरे जाण्यासाठी बैठकीमध्ये दिशा ठरविण्यात आली. राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीत तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कार्यक्रम समन्वयक, समुदाय आरोग्य अधिकारी तसेच एनएचएमचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी गुप्ता यांनी प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक यांची पदे भरलेली असावीत असे आरोग्य यंत्रणेला निर्देश दिले. “ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ई.डी.डी. ट्रेकिंग झाली पाहिजे, तसा बोर्ड लावण्यात यावा, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी प्रसूतीचे प्रमाण वाढले पाहिजे, असांसर्गिक आजार कार्यक्रम, आरसीएच पोर्टल सह सर्व पोर्टल अपडेट करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ******

No comments: