01 October, 2025

क्युआर कोड स्कँन करा अन् 'हिंगोली कलेक्टर' व्हॉट्सअँप चॅनेलवर कनेक्ट व्हा

हिंगोली, दि. ०१ (जिमाका) : जिल्ह्यातील विविध शासकीय योजना, उपक्रम, कार्यक्रम, ताज्या घडामोडी तसेच महत्त्वाच्या सूचना नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाने 'हिंगोली कलेक्टर' या नावाने अधिकृत व्हॉट्सअँप चॅनेल सुरू केले आहे. या चँनेलला क्युआर कोडच्या सहाय्याने नागरिकांनी कनेक्ट होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. या चॅनेलद्वारे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या, शासन निर्णय, जनजागृतीविषयक उपक्रम, कृषी, शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रातील माहिती सोप्या आणि जलद पद्धतीने नागरिकांना मिळणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेला QR कोड स्कॅन करून किंवा थेट व्हॉट्स अँपवरील ‘हिंगोली कलेक्टर’ या चॅनेलला नागरिक फॉलो करू शकतात. शासनाच्या योजना व सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने या चॅनेलशी जोडून शासन व जिल्हा प्रशासनाशी संपर्क ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. *****

No comments: