31 July, 2025
इतर मागासवर्ग बहुजन कल्याण प्रवर्गातील मुलां-मुलीसाठी वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रकिया सुरु
• 17 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 31 : इतर मागास बहुजन कल्याण प्रवर्गातील मुलां-मुलीसाठी वसतिगृहांमध्ये शैक्षणिक सन 2025-26 करिता प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रकिया सुरु झालेली आहे. त्यानुसार या विभागांतर्गत कार्यरत असलेल्या मुलां-मुलींच्या वसतिगृहांमध्ये तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतंर्गत 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.
या शासनाच्या https://hmas.mahait.org या ऑनलाईन पोर्टलवर बी.ए, बी.कॉम, बी.एस.सी अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) दिनांक 1 ते 17 ऑगस्टपर्यंत अर्ज भरून ऑनलाईन अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे संबंधित वसतिगृहात विहीत मुदतीत सादर करावीत.
जिल्ह्यातील इमाव, विमाप्र, विजाभज विद्यार्थ्यांनी वसतिगृह तसेच आधार व स्वयंम योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी ओबीसी मुला-मुलींचे वसतीगृह हिंगोली येथील गृहपाल तसेच सहाय्यक संचालक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक यादव गायकवाड यांनी केले आहे.
*****
मौजे फाटा येथील रास्तभाव दुकानासाठी आक्षेप आल्याने प्रक्रिया थांबवली • वसमत तालुक्यातील उर्वरित 15 गावातील रास्त भाव दुकानासाठी 20 ऑगस्टपर्यंत अर्ज भरावेत
हिंगोली (जिमाका), दि. 31 : वसमत तालुक्यातील 16 रास्तभाव दुकानापैकी मौजे फाटा येथील मूळ परवानाधारकाने आक्षेप नोंदविल्यामुळे मौजे फाटा येथील रास्त भाव दुकानाची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. मौजे फाटा हे गाव वगळता उर्वरित 15 गावातील रास्तभाव दुकानासाठी 20 ऑगस्टपर्यंत अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.
याबाबतचे जाहीर प्रगटन तहसील कार्यालयामार्फत गावात डकवण्यात आलेले आहे. यासाठी भरावयाचे अर्ज तहसील कार्यालय, वसमत येथे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.
रास्तभाव दुकाने, किरकोळ केरोसीन परवाने दि. 6 जुलै, 2017 च्या शासन निर्णयानुसार पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था), नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वयंसहाय्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था या प्राधान्य क्रमानुसार मंजूर करण्यात येतील. ही रास्तभाव दुकाने व किरकोळ केरोसीन परवाने मंजूर केलेल्या दुकानाचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदायाद्वारे करणे आवश्यक राहील. अधिकृत स्वयं सहाय्यता गटांना प्राधिकारपत्राच्या अटी शर्तीच्या पालनार्थ भरावयाच्या प्रतिभूती ठेवीच्या रक्कमा चलनाव्दारे बँकेत शासन जमा नियमानुसार कराव्या लागतील. रास्तभाव दुकान, किरकोळ केरोसीन परवाने मंजूर करण्यासाठी प्राथ्यम्य सूची दि. 3 नोव्हेंबर, 2007 व दि. 25 जून, 2010 च्या शासन निर्णयानुसार विचारात घेतली जाईल.
प्राथम्यसूचीनुसार गटांची निवड करताना जेष्ठ, वर्धनक्षम व नियमित कार्यरत असलेल्या, अंतर्गत व्यवहार पारदर्शक व परतफेड चोख व नियमित असलेल्या व प्रतिवर्षी लेखापरिक्षण केलेल्या गटास प्राधान्य देण्यात येईल. निवड करावयाच्या गटाचे हिशोब व लेखे अद्यावत असावेत व परतफेडीचे प्रमाण किमान 80 टक्के असावे. आवेदन करणाऱ्या संस्थांनी दि. 3 नोव्हेंबर, 2007, दि. 6 जुलै, 2017 व 1 ऑगस्ट, 2017 या शासन निर्णयांचे वाचन करुन आवेदनपत्र अचूक भरावेत. अर्ज भरण्याची मुदत ही दिनांक 22 जुलै ते 20 ऑगस्ट, 2025 पर्यंत तहसील कार्यालयात कार्यालयीन वेळेत विहित नमुन्यात स्वीकारण्यात येतील. वरील दाव्याचे पृष्ठीकरिता लेखी पुरावे सादर करणे आवश्यक आहे. स्वंय सहाय्यता बचत गटाची निवड करण्याचे काम जिल्हा पुरवठा अधिकारी अध्यक्ष असलेली शासन नियुक्त समिती (त्या गावच्या महिला ग्रामसभेची शिफारस विचारात घेऊन) करील. या जाहिरनाम्यामध्ये अशंतः किंवा पूर्णतः बदल करण्याचे अधिकार निम्न स्वाक्षरीकाराने राखून ठेवले आहेत, असे जिल्हा पुरवठा अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
*****
30 July, 2025
टपाल विभागात चार दिवस आर्थिक पत्रव्यवहार बंद * आयटी 2.0 अँप्लिकेशनची ४ ऑगस्टपासून सुरुवात
हिंगोली (जिमाका), दि. 30 : टपाल विभागाला पुढील पिढीतील एपीटी अँप्लिकेशन (आयटी 2.0) अंमलबजावणी करण्याची सुरुवात करण्यात येत असल्यामुळे १ ते ४ ऑगस्टदरम्यान पोस्ट ऑफिसमध्ये आर्थिक व्यवहार बंद राहणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.
डिजिटल उत्कृष्टता आणि राष्ट्र उभारणीच्या प्रवासात एक मोठी झेप आहे. या परिवर्तनकारी उपक्रमाचा एक भाग म्हणून, अपग्रेड केलेली प्रणाली परभणी विभागामधील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये दि. 4 ऑगस्ट, 2025 रोजी लागू करण्यात येणार आहे.
या प्रगत डिजिटल प्लॅटफॉर्मवर एक अखंड आणि सुरक्षित संक्रमण सक्षम करण्यासाठी दि. 1 ऑगस्ट, 2025 रोजी नियोजित डाउनटाइम करण्यात आला आहे. त्यामुळे दि. 1 ते 4 ऑगस्ट, 2025 या कालावधीत परभणी विभागातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये कोणतेही आर्थिक पत्रव्यवहार केले जाणार नाहीत. डेटा मायग्रेशन, सिस्टीम व्हॅलिडेशन आणि कॉन्फिगरेशन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, नवीन सिस्टम सुरळीत आणि कार्यक्षमतेने लाइव्ह होईल याची खात्री करण्यासाठी सेवांचे हे तात्पुरते निलंबन आवश्यक आहे. एपीटी अँप्लिकेशन वापरकर्त्याचा अनुभव वाढविण्यासाठी, जलद सेवा वितरण आणि अधिक ग्राहक-अनुकूल इंटरफेस प्रदान करण्यासाठी डिझाईन केले आहे. ग्राहकांनी त्यांच्या भेटीचे व आर्थिक व्यवहारांचे आगाऊ नियोजन करावे, असे आवाहन अधीक्षक डाकघर, परभणी विभाग यांनी केले आहे.
******
हिंगोली जिल्ह्यात '300 आपदा मित्रांना' मिळणार प्रशिक्षण
हिंगोली, दि. 30 (जिमाका): राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संकल्पनेतून देशभरात राबविण्यात येणाऱ्या 'आपदा मित्र' योजनेअंतर्गत जिल्ह्यात 300 स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार उर्वरित 16 जिल्ह्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणी केली जाणार असून त्यात हिंगोली जिल्ह्याचा समावेश आहे.
या उपक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे आपत्तींमध्ये प्रथम प्रतिसाद देणाऱ्या स्थानिक नागरिकांना प्रशिक्षित करून त्यांना सक्षम करणे, जीवितहानी कमी करणे व समाजात आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती निर्माण करणे हा आहे. यामुळे स्थानिक पातळीवर प्राथमिक प्रतिसादासाठी सज्ज मनुष्यबळ तयार होणार आहे.
12 दिवसांचे निवासी प्रशिक्षण, वैयक्तिक आपत्कालीन प्रतिसादकर्ता संच, 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण (3 वर्षांकरिता), प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच किटचे वितरण आदी प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये आहेत.
आपदा मित्र निवडीचे निकष खालीलप्रमाणे आहेत. भारताचे नागरिक व हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असावा. शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. त्याचे वय 18 ते 45 वर्षां (विशेष बाबतीत 55 वर्षांपर्यंत वयमर्यादा) दरम्यान असावे. किमान 35 टक्के महिलांचा सहभाग आवश्यक असून, माजी सैनिक, डॉक्टर, अभियंते, वैज्ञानिक, निवृत्त आपत्कालीन सेवा कर्मचारी यांचा विशेष समावेश आहे.
सर्वसामान्य नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी/विद्यार्थिनी, एनएसएस, एनसीसीचे स्वयंसेवक, एनजीओचे प्रतिनिधी व स्वयंसेवक या प्रशिक्षणात सहभागी होऊ शकतात.
हिंगोली जिल्ह्यातील इच्छुकांनी आपले नाव आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे नोंदवावे. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 8408067158 / 02456-222560 या कार्यालयीन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
******
29 July, 2025
हिंगोलीत 'अमृत' कार्यालय सुरु
हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या समन्वय बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या महत्त्वपूर्ण बैठकीस जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, अमृत योजनेचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत धोत्रे व डाटा एंट्री ऑपरेटर संजय मेथेकर यांची उपस्थिती होती .
या बैठकीदरम्यान 'अमृत' योजनेसंदर्भात सविस्तर चर्चा होऊन, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर अमृतच्या संपर्क कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली. ही जागा ताब्यात घेऊन त्वरित कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्याच दिवशीपासून सेवा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
'अमृत' कार्यालयातून स्वयंरोजगार योजना, वैयक्तीक व्याज परतावा, तसेच प्रशिक्षणाशी संबंधित लाभार्थ्यांची कागदपत्रे स्वीकारून प्रक्रियेची पूर्तता करण्यात आली आहे. या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ अधिक जलद आणि पारदर्शक पद्धतीने मिळणार आहे. या नव्या उपक्रमामुळे हिंगोली जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी एक नवा मार्ग उघडला असून, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केंद्र म्हणून 'अमृत' कार्यालय ठरणार आहे.
अधिक माहितीसाठी आणि सेवा घेण्यासाठी अमृत कार्यालयाचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत धोत्रे (7391065471) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*****
जागतिक हिपॅटायटीस सप्ताहानिमित्त आरोग्य कर्मचाऱ्यांची हिपॅटायटीस बी तपासणी • हिपॅटायटीस आजाराचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 29 : राष्ट्रीय आरोग्य अभियांनातर्गंत राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम हा राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये सुरु करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमांतर्गंत राज्यात 4 आदर्श उपचार केंद्र व 32 उपचार केंद्र याची उभारणी करण्यात आलेली आहे. या केंद्रामार्फत हिपॅटायटीस रुग्णांची तपासणी व औषधोपचार उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
हिपॅटायटीस या आजाराबद्दल समाजामध्ये जागरुकता निर्माण होण्यासाठी दरवर्षी 28 जुलै रोजी जागतिक हिपॅटायटीस दिन साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षी 'हिपॅटायटीस : लेटस् ब्रेक इट डाऊन' हे हिपॅटायटीस दिनाचे घोषवाक्य प्रसिद्ध केलेले आहे. केंद्र शासन व राज्य शासनाच्या सूचनेनुसार हिपॅटायटीस दिनानिमित्त दि. 22 जुलै ते दि. 28 जुलै, 2025 या दरम्यान सप्ताह साजरा करण्याबाबत सूचित केले आहे.
या अनुषंगाने हिंगोली जिल्हा रुग्णालयात जागतिक हिपॅटायटीस सप्ताहानिमित्त दि. 28 जुलै 2025 रोजी आरोग्य कर्मचाऱ्यांची हिपॅटायटीस बी तपासणी करुन निगेटीव्ह व्यक्तीस हिपॅटायटीस बी लसीचे (वॅक्सीन) तीन डोस (0, 1 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर) देण्यात आले आहे. तसेच गरोदार माता व इतर रुग्णांची हिपॅटायटीस बी व सी तपासणी करण्यात आली आहे.
जागतिक हिपॅटायटीस दिनानिमित्त सप्ताह साजरा करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, अधिष्ठाता यांच्या मार्गदर्शनाखाली 28 जुलै 2025 रोजी 25 अधिकारी कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक मोरे, भूलतज्ञ डॉ. नितीन पुरोहित, एमडी पॅथॉलाजीस्ट डॉ. कंठे, पॅथालॉजीस्ट डॉ. इंगोले, ज्ञानेश्वर चौधरी, सहायक अधिसेविका आशा क्षीरसागर, तातेराव डुकरे, मुकूंद शिंदे यांच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी जिल्हा समन्वयक लक्ष्मण गाभणे, औषध निर्माता मनोज इंगोले, कार्यालयीन कर्मचारी व रुग्णालयीन अधिपरिचारिका इत्यादींनी परिश्रम घेतले.
हिंगोली जिल्ह्यातील जनतेला या कार्यक्रमामार्फत दैनदिन जीवनात वावरतांना हिपॅटायटीस आजारासंदर्भात वेळोवेळी हिपॅटायटीस बी व सी रक्त तपासणी करावी व हिपॅटायटीस या आजाराचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी केले आहे.
*****
जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू
हिंगोली (जिमाका), दि. 29 : ऑगस्ट महिन्यात हिंगोली जिल्ह्यात होणाऱ्या विविध सण-उत्सव, स्पर्धा आणि सभा, बैठका, धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी दिले आहेत.
दि. 1 ऑगस्ट, 2025 रोजी अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी, दि. 4 ऑगस्ट रोजी दुसरा श्रावण सोमवार, दि. 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन व दि. 11 ऑगस्ट, 2025 रोजी तिसरा श्रावण सोमवार आहे. तसेच श्रावण मासानिमित्त कावड यात्रा काढण्यात येतात. तसेच मराठा आरक्षण व इतर आरक्षण संबंधाने घडणाऱ्या राजकीय घडामोडी, नागरिक, विविध संघटना, पक्ष यांच्या मागण्यासंदर्भात मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे करीत असतात. अशा विविध घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दि. 29 जुलै, 2025 रोजी मध्यरात्रीपासून ते दि. 12 ऑगस्ट, 2025 रोजी मध्यरात्रीपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) अन्वये शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्याजवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तूजवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटकद्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल, अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना जाणून बुजून दुखावतील, या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
******
28 July, 2025
वायू प्रदूषण प्रमाणपत्र संपलेल्या वाहनांनी नूतनीकरण करुन घ्यावेत
• वैधता संपलेल्या वाहनावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश
हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्हाधिकारी यांनी आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार हिंगोली जिल्ह्यातील वायू प्रदूषण प्रमाणपत्राची वैधता संपलेल्या वाहनावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्रीय मोटार अधिनियम 1989 मधील कलम 115 (7) अन्वये सर्व वाहनधारकाचे वायू प्रदूषण प्रमाणपत्र वैध असणे आवश्यक आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी आपल्या वाहनाचे वायू प्रदूषण नूतनीकरण लवकरात लवकर करुन घ्यावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे यांनी केले आहे.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत वैधता संपलेल्या वाहनाविरुद्ध दि. 30 जुलै, 2025 पासून विशेष तपासणी मोहीम सुरु करुन पीयुसी समाप्त झालेल्या वाहनावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मोटार सायकल, तीन चाकीच्या वाहन मालकाला एक हजार व वाहनचालकाला एक हजार तर चारचाकी व मालवाहू वाहनाच्या मालकाला 2 हजार व वाहनचालकाला 2 हजार याप्रमाणे दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
*****
वसमत आयटीआयमध्ये तासिका तत्त्वावर पद भरतीसाठी शनिवारी मुलाखत
हिंगोली (जिमाका), दि. 28 : वसमत येथील स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल शासकीय प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये सोलार टेक्निशियन इलेक्ट्रिकल या नवीन ट्रेडच्या दोन युनिटला शासनाकडून मान्यता मिळालेली असल्याने या ट्रेडला सन 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश करावयाचे आहेत. त्यासाठी या ट्रेडसाठी तासिका तत्त्वावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात 11 महिन्याकरिता निदेशक नियुक्तीसाठी संस्थेमध्ये शनिवार, दिनांक 2 ऑगस्ट, 2025 रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या पदाच्या पात्रतेसाठी www.dget.gov.in व www.dvet.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि परिसरातील सर्व पात्रताधारक उमेदवारांनी आपला बायोडाटा व अर्ज 2 ऑगस्ट 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत जमा करावेत. तसेच त्याच दिवशी पात्र पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस. एल. कोंडावार यांनी केले आहे.
*****
मधमाशा पालन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 28 : राज्यात सुमारे 70 टक्के लोकसंख्या शेती व्यवसायावर उपजीविका करत आहे. शेती व्यवसाय अधिक फायदेशीर होण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. मधमाशामुळे शेती उत्पन्नात भरघोस वाढ होत आहे. मध उद्योग हा केवळ शेतीपूरक व्यवसाय व जोडधंदा म्हणून न करता एक मुख्य उद्योग म्हणून केल्यास ग्रामीण रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. मधमाशांच्या मधपेट्या शेती पिके, फळबागायतींच्या ठिकाणी, तसेच जंगलात ठेवल्यास मधमाशाद्वारे पर-परागीभवन होऊन पिकांच्या उत्पादनात पिकांच्या प्रकारानुसार 10 ते 45 टक्के उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ मधमाशांच्या मधाच्या व मेणाच्या किंमतीच्या 10 ते 15 टक्के अधिक आहे.
त्यामुळे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशी पालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेद्वारे मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष (छंद) प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या योजनेचा जास्तीत-जास्त शेतकरी, कातकरी, सुशिक्षित बेरोजगारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
या योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता पुढीलप्रमाणे आहेत.
1. वैयक्तिक मधपाळ योजना : या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार साक्षर असावा. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य, वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.
2. केंद्र चालक प्रगतीशील मधपाळ योजना : या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्ती वैयक्तिक केंद्र चालक असावा. शैक्षणिक पात्रता किमान 10 वी पास असावी, वय 21 वर्षापेक्षा जास्त असावे. अशा व्यक्तींच्या नावे अथवा त्या व्यक्तीच्या कुटूंबातील कोणत्याही व्यक्तींच्या नावे किमान एक एकर शेत जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन, लाभार्थीकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.
3. केंद्रचालक संस्था : योजनेचा लाभ घेण्यासाठी संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे मालकीची किंवा 10 वर्षासाठी भाडेतत्वावर घेतलेली किमान एक एकर शेत जमीन, संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान एक हजार चौरस फूट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशीपालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेली संस्था असावी.
वरील योजनेसाठी लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरु करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे तसेच निश्चित ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, हॉल नं एस-11, नांदेड रोड, हिंगोली मो.नं. 9860404917, 9822528534, ई-मेल पत्ता- dviohingoli@mskvib.org आणि संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, सरकारी बंगला नं. 5 महाबळेश्वर, जि. सातारा पिन-412806 (दूरध्वनी- 02168-260264) यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी, सुशिक्षित बेरोजगारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
*******
जिल्हा वार्षिक योजनेतून करण्यात येणाऱ्या व केलेल्या कामांची जिओ टॅग छायाचित्रे गुरुवारपर्यंत उपलब्ध करुन द्यावीत - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
• चालू वर्षाचे परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ सादर करावेत
• सन 2024-25 च्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र व खर्चाचा ताळमेळ तातडीने सादर करावेत
हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्हा वार्षिक योजनेतून सन 2024-2025 या वर्षात केलेल्या कामाचे काम करण्यापूर्वीचे व नंतरचे जीओटॅगची छायाचित्रे तसेच चालू वर्षाच्या कामाचे प्रस्ताव सादर करताना संबंधित कामाच्या ठिकाणाचे जीओटॅग छायाचित्रे गुरुवारपर्यंत उपलब्ध करुन द्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे, समाज कल्याणच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे तसेच सर्व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 अंतर्गत विविध विकास योजनांचे परिपूर्ण प्रस्ताव कामाची यादी व जीओ टॅग छायाचित्रांसह प्रशासकीय मान्यतेसाठी तात्काळ सादर करावेत. यासोबतच सन 2024-25 या आर्थिक वर्षातील केलेल्या कामाचे उपयोगिता प्रमाणपत्र, खर्चाचा ताळमेळ अहवाल देखील त्वरित पाठवावा. पायाभूत विकासाच्या योजनांसाठी एमआर सॅक यांच्याकडून सर्व निधीचे ॲसेट क्रिएटीव्ह करण्यासाठी युनिक आयडी तयार करण्यात येत आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांनी आपल्या कार्यालयाची माहिती एक्सेलशीटमध्ये तात्काळ सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले.
यावेळी महावितरण, पोलीस, जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभाग, कृषि विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण, महिला व बालविकास विभाग, वन विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह विविध विभागांच्या प्रस्तावाबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत प्रशासनाच्या विविध विभागांना त्यांच्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
*****
युवकांनी भारत मातेच्या सेवेसाठी योगदान द्यावे -अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे
• कारगिल विजय दिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली
हिंगोली (जिमाका), दि. 28: युवकांनी सैन्यात भरती होऊन भारत मातेच्या सेवेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी केले.
कारगील विजय दिवस निमित्त शनिवार (ता. 26) रोजी अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे व उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शहिदांना अभिवादन केले, तसेच कारगील युद्धात ज्या सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्या सर्व सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करीत कारगील विजय दिवसानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना अपर जिल्हाधिकारी श्री. कांबळे म्हणाले, कारगील युद्धात ज्या सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्व सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कारगिल दिवस साजरा करण्यात येत असल्याचे सांगून माजी सैनिकांच्या अडीअडचणी जाणून घेत त्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर असल्याचे सांगितले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात हिंगोली जिल्ह्यातील माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सय्यद मीर, सुभेदार मेजर पुंडगे भीमराव, सुभेदार नामदेव मस्के, बाबूराव जांबुतकर, पंडित हाके, पुंडलिक महाराज, सुर्यकुमार बळखंडे यांच्यासह युद्ध वीर मरण आलेल्या सैनिकांच्या वीर नारी, वीर माता यांचा अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण संघटक कॅप्टन मुकाडे, खराटे संघपाल, कडुजी टापरे, सिताराम फुपाटे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
*****
27 July, 2025
पत्रकारांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पत्रकारिता करावी -- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
* हिंगोली माध्यम प्रतिनिधींची कार्यशाळा उत्साहात संपन्न
हिंगोली (जिमाका), दि. 27: पत्रकारांनी कृत्रिम बुद्धिमत्ते (एआय)ने विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पत्रकारिता करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत असलेल्या जिल्हा माहिती कार्यालयामार्फत येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात पत्रकारांसाठी एकदिवशीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी राम कैलाश मीना, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, प्रा. दीपक रंगारी, तुकाराम झाडे, नंदकिशोर तोष्णीवाल उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील मुद्रित माध्यमे, ईलेक्ट्रॉनिक, समाजमाध्यमांत काम करणा-या पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रसार माध्यमात काम करताना दैनंदिन कमकाजात जास्तीत जास्त वापर करता येईल, याविषयी प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात चँट जीपीटीच्या माध्यमातून आपल्याला हव्या त्या विषयाची माहिती टंकलिखित करताक्षणी काही सेकंदात उपलब्ध होते, आणखी काही शिक्षण विभागातील मुलांसाठी अभ्यासक्रमातील चाचणी परीक्षा घेण्यासाठी प्रश्न पत्रिकेचा मजकूर टाकल्यास प्रश्न आणि त्याचे उत्तरही सहज मिळते, त्यामुळे या चँट जीपीटीचा वापर करून सविस्तर माहिती मिळविता येते. मात्र आपल्याला काय हवे याची माहिती असणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित मार्गदर्शन कार्यशाळेत जिल्हा सूचना अधिकारी राम मीना यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता याबाबत मार्गदर्शन करताना सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली.
प्रा. दीपक रंगारी यांनी वृत्तसंकलन-संपादनात शुद्धलेखनाचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करताना मराठी प्रमाणभाषेच्या शुद्धलेखनाचे नियम, शब्दाचा अर्थ, भाषेतील व्याकरणाचा वापर याबरोबरच मराठी भाषा समृद्ध करण्यात विविध साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाविषयी माहिती दिली. वाक्यामध्ये येणारी क्रियापदे, शब्दयोगी अव्यय, ऱ्हस्व, दीर्घ, ईकारांत याबरोबरच एकाक्षरी क्रियापद, शब्दयोगी अव्यय, तत्सम आणि तद्भव शब्दांविषयीचे स्पष्टीकरण उदाहरणासह समजावून सांगितले. शब्दकोश आणि लेखनकोश याचा वापर करून पत्रकाराचे निर्दोष लिखाण कसे असावे, याविषयी मार्गदर्शन केले.
जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते यांनी पत्रकारांसाठी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या अधिस्वीकृती पत्रिका, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना, शंकराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी, उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार आदी विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी पत्रकार नंदकिशोर तोष्णीवाल, संतोष भिसे यांनी पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करुन चांगल्या प्रकारची माहिती दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रद्मुम्न गिरीकर यांनी केले, तर आभार चंद्रकांत कारभारी यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रकांत कारभारी, श्रीकांत देशमुख, गंगा देशमुख आदींनी परिश्रम घेतले.
******
25 July, 2025
वसमत आयटीआय मध्ये विजय दिन साजरा
हिंगोली (जिमाका), दि. 25: कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून वसमत आयटीआयमध्ये दि. 24 जुलै, 2025 रोजी विजय दिवस साजरा करण्यात आला.
या विजय दिवसाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे प्राचार्य एस. एल. कोंडावार हे होते, विजय दिवसानिमित्त मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख वक्ता म्हणून प्रा.डॉ.शशिकांत तोळमारे यांना आमंत्रित करण्यात आलेले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आयटीआयमधील आयएमसीचे सदस्य राजेश भालेराव, सुजित आंबेकर व शंतनु देशपांडे हे उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रा. तोळमारे यांनी उपस्थितांना कारगील युद्धाबद्दल माहिती देऊन विजय दिवसाचे महत्त्व सांगितले. तसेच संस्थेचे प्राचार्य एस. एल. कोंडावार यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना विजय दिवसाचे महत्त्व सांगितले, तसेच संस्थेतील गटनिदेशक टी. जे. झाड, शिल्प निदेशक गणेश येमेवार, आर. एन. कानगुले, एन.एस. सबनवार, पी.व्ही वानखेडे, एस. आर. पडघन, मुख्य लिपिक एस.आर खूपसे, वरिष्ठ लिपिक श्रीमती आर.जे शहारे व कार्यालयीन कर्मचारी डी. व्ही साळवे, एन. एच वाहेवळ यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
******
रेड रिबन क्लब महाविद्यालयातील नोडल अधिकारी यांची एचआयव्ही/एड्स विषयक कार्यशाळा संपन्न
हिंगोली (जिमाका), दि. 25: जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयातील जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षामार्फत डापकू सभागृहात जिल्ह्यातील रेड रिबन क्लब महाविद्यालयातील सर्व नोडल अधिकारी व पिअर एज्युकेटर यांची एचआयव्ही/एड्स विषयी आज कार्यशाळा संपन्न झाली.
यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डी. एस. चौधरी यांनी एचआयव्हीला हद्दपार करण्यासाठी युवकांची भूमिका सर्वात महत्वाची असल्याने त्यांना एचआयव्ही/एड्स याविषयी माहिती असणे किती गरजेचे आहे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच रेड रिबन क्लब अंतर्गत महाविद्यालय स्तरावर वर्षभर घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी संजय पवार, श्रीमती टीना कुंदणानी व आशिष पाटील यांनी परिश्रम घेतले.
******
हिंगोली येथे रविवारी पत्रकार कार्यशाळेचे आयोजन
• जिल्ह्यातील पत्रकारांनी कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 25: माहिती व जनंसपर्क महासंचालनालयांतर्गत असलेल्या येथील जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने रविवार, (दि. 27) रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात हिंगोली जिल्ह्यातील पत्रकारांसाठी एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत विविध वक्त्यामार्फत वृत्तसंकलन, संपादनात शुद्धलेखनाचे महत्त्व, एआयचा वापर, पत्रकारांना देण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी या कार्यशाळेस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते यांनी केले आहे.
******
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मराठवाडा उपविभागीय कार्यालयाचे बीड येथे रविवारी उद्घाटन
• लाभार्थ्यांच्या समस्यांचे त्वरित निवारण व योजनांचा व्यापक प्रसार हे उद्घाटनाचे मुख्य उद्दिष्ट
हिंगोली, दि. 25 (जिमाका): अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेची मराठवाड्यातील वाढती व्याप्ती लक्षात घेता, महामंडळाच्या मराठवाडा विभागासाठी उपविभागीय कार्यालय स्थापन करण्यात आले असून, याचे उद्घाटन रविवार, (दि.27) रोजी सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड येथे होणार आहे.
या उपविभागीय कार्यालयाची स्थापना अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनच्या विशेष सहकार्यातून करण्यात आली असून, उद्घाटनप्रसंगी लाभार्थींच्या विविध समस्यांवर मार्गदर्शन व त्वरित निवारणासाठी विशेष मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे.
महामंडळाच्या योजनांचा सरल व थेट लाभ मराठवाड्यातील मराठा समाजापर्यंत पोहोचवणे, ई-सेवा व खाजगी केंद्रांमधून होणारी फसवणूक रोखणे, प्रलंबित कर्ज प्रकरणे व व्याज परतावा त्रुटींवरील समस्यांचे निवारण करणे, तसेच तक्रारींवर हेल्पलाईनद्वारे त्वरित कारवाई करण्यासाठी हे कार्यालय कार्यरत राहणार आहे.
राजू कॉम्प्लेक्स, २रा मजला, हिना हॉटेलसमोर, जालना रोड, बीड येथे हे सुसज्ज व अद्ययावत उपविभागीय कार्यालय सुरु होणार असून, लाभार्थ्यांना येथे महामंडळाच्या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होतील. या कार्यालयामुळे मराठवाड्यातील लाभार्थ्यांना मुंबई किंवा पुण्यासारख्या ठिकाणी धावपळ न करता स्थानिक पातळीवर सेवा मिळणार आहे.
महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले की, भविष्यात तालुकास्तरावरही योजना पोहोचवण्यासाठी दौरे आयोजित करण्यात येणार आहेत.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामंडळाच्या योजनांची माहिती घेण्याचे व आपली तक्रार निवारण करून घेण्याचे आवाहन विभागीय समन्वयक प्रवीण आगवण पाटील यांनी केले आहे.
******
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाशी जिल्ह्यातील तीन रुग्णालये संलग्नीत
पात्र व गरजू रुग्णांना 1 जानेवारीपासून 14 लाख रुपयांचे अर्थसहाय्य वितरीत
हिंगोली (जिमाका), दि. 25: मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष पात्र व गरजू रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. 1 जानेवारी ते आतापर्यंत या कक्षामार्फत हिंगोली जिल्ह्यातील 17 रुग्णांना 14 लाख 10 हजार रुपयांची मदत वितरीत करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे नोडल अधिकारी डॉ.नामदेव कोरडे यांनी दिली आहे.
राज्यातील नागरिकांना दुर्धर आजारांवरील उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून आर्थिक सहाय्य देण्यात येते. तसेच आपत्ती प्रसंगीही आर्थिक मदत देण्यात येते. यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून मदत मिळविण्यासाठी नागरिक मंत्रालयात जात असत. परंतु नागरिकांना या सेवा सहजपणे त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी उपलबध व्हाव्यात, म्हणून आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सध्या हिंगोली येथे हा कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत कार्यरत आहे.
वैद्यकीय मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाशी संलग्नीत हिंगोली जिल्ह्यातील उर्मिला हॉस्पिटल नांदेड रोड, हिंगोली, नाकाडे हॉस्पिटल हिंगोली, जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली या तीन रुग्णालयांचा समावेश आहे. या निधीच्या मदतीतून रुग्ण या रुग्णालयात उपचार करुन घेतात.
गरजू व पात्र रुग्णांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष येथे संपर्क साधावा, असे डॉ. कोरडे यांनी केले आहे.
*******
हिंगोली जिल्ह्यासाठी उद्या ऑरेंज अलर्ट जाहीर
* प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबईकडून सतर्कतेचा इशारा; नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 25: प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यात दि. 25 जुलै 2025 रोजी येलो अलर्ट तर दि. 26 जुलै 2025 रोजी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे. या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून, विजेच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या नैसर्गिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी खालील मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत:
काय करावे:
विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असल्यास बाहेर जाणे टाळा. मोकळ्या जागेत असल्यास सखल भागात जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. बाल्कनी, छत किंवा ओट्यावर थांबू नका. घरातील विजेची उपकरणे बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर धातूच्या वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असल्यास तत्काळ सुरक्षित जागी हलवा.
काय करू नये:
विजा चमकत असताना लँडलाईन फोन, विद्युत उपकरणांचा वापर, शॉवरखाली अंघोळ किंवा बेसिनच्या नळाला स्पर्श करू नये. धातूच्या तंबू किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाखाली थांबू नका. धातूच्या उंच मनोऱ्याजवळ थांबू नका. उघड्या दरवाजातून किंवा खिडकीतून वीज पाहण्याचा प्रयत्न करू नका.
हवामान खात्याच्या सूचनांनुसार जिल्हा प्रशासन सतर्क असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी सामाजिक माध्यमांवरील अपप्रचार टाळून अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
*******
24 July, 2025
हिंगोलीत 27 वी सब-ज्युनियर राज्यस्तरीय फेन्सिंग स्पर्धा ८ ऑगस्टपासून • जिल्हाधिकाऱ्यांकडून आयोजनाबाबत आढावा
हिंगोली (जिमाका), दि. 24 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात 27 वी राज्यस्तरीय सब-ज्युनियर फेन्सिंग स्पर्धा आयोजनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी आयोजनासंदर्भात महत्त्वाच्या बाबीवर आढावा घेऊन संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या.
या बैठकीस निवासी जिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश मारावार, क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पवार, नगरपालिका उपमुख्याधिकारी प्रकाश साबळे, पोलीस विभागाचे अखिल जब्बार व अतुल बोरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे ए. ओ. कटोळे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस. पी. डोंगरे, हिंगोली जिल्हा फेन्सिंग संघटनेचे अध्यक्ष कल्याण देशमुख, सचिव संजय भुमरे, सहसचिव नरेंद्र रायलवार आणि राष्ट्रीय खेळाडू संदीप वाघ आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दि. 8 ऑगस्ट ते दि. 10 ऑगस्ट रोजी आयोजित राज्यस्तरीय सब ज्युनिअर फेन्सिंग स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या बाबीचा आढावा घेतला. यामध्ये जिल्हा क्रीडा संकुलात स्पर्धा होत असल्यामुळे त्या ठिकाणी खेळाडूंना सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी त्यांनी आवश्यक किरकोळ दुरुस्ती याचबरोबर स्वच्छतेची कामे करण्याच्या सूचना दिल्या. स्पर्धा कालावधीत खेळाडूंना भोजन, निवास या संदर्भात आढावा घेऊन आवश्यक सूचना केल्या. स्पर्धेच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त, आरोग्य विभागामार्फत सुसज्ज रुग्णवाहिका व वैद्यकीय पथक ठेवावेत. जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश मारावार यांनी आवश्यक ती तयारी करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.
या बैठकीचे प्रास्ताविक असोसिएशनचे अध्यक्ष कल्याण देशमुख यांनी केले. या बैठकीत 14 वर्षांखालील मुला-मुलींसाठीची ही राज्यस्तरीय फेन्सिंग स्पर्धा दिनांक 8 ते 10 ऑगस्ट 2025 दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, लिंबाळा (मक्ता), हिंगोली येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सुरक्षा, निवास, भोजन, आरोग्य तपासणी, आणि मैदानी व्यवस्था याबाबत सविस्तर चर्चा झाली. हिंगोली जिल्ह्याला प्रथमच अशा दर्जेदार फेन्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान लाभत असल्याने सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे ठरवण्यात आले.
**
23 July, 2025
उमरा, शिरडशहापूर येथील शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट
* गैरहजर शिक्षकांवर कारवाईचे आदेश
हिंगोली, दि.23 (जिमाका): जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज उमरा व शिरड शहापूर येथील जिल्हा परिषद शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देत वस्तुस्थितीचा आढावा घेतला. शाळेच्या भेटीदरम्यान प्रभारी केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक शेषराव बांगर आणि शिक्षिका विनापरवानगी गैरहजर असल्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांना दिले.
जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी आज उमरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली असता, त्यांना शिक्षिका श्रीमती अंबरबडे या विनापरवानगी गैरहजर असल्याचे आढळून आल्या. तर दुसऱ्या शिक्षिका श्रीमती भोसले यांची अध्यापनातील कार्यक्षमता समाधानकारक नसल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी शाळेतील अभिप्राय नोंदवहीत नोंद केली आहे. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती अत्यंत कमी असल्यामुळे शिक्षिका श्रीमती अंबरबडे आणि श्रीमती भोसले यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांना दिले आहेत.
तसेच जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शिरडशहापूर येथील प्राथमिक कन्या शाळेला भेट दिली असता, येथील शिक्षिका श्रीमती सुचिता लक्ष्मणराव माटे या गैरहजर असल्याचे आढळून आल्या. तर शाळेत उपस्थित असलेल्या शिक्षिका श्रीमती ढोकाडे यांनी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांच्यासमक्ष श्रीमती माटे यांच्या पूर्वीच लिहिलेल्या विना दिनांक रजा अर्जांची नोंद घेतली. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शिक्षण विभागातील या बाबीबद्दल खेद व्यक्त केला असून, अशा कामचुकार शिक्षकांविरोधात प्रशासकीय कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच विनापरवानगी गैरहजर शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कापण्याचे आदेश दिले. इयत्ता पहिली आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता जेमतेम असल्याचे त्यांच्या तपासणीअंती निदर्शनास आले असून, त्यांना पायाभूत शैक्षणिक बाबीही येत नसल्याची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी अभिप्राय नोंदवहीत नोंद केली आहे. त्याशिवाय येथील शाळेत मानधन तत्वावर कार्यरत शिक्षिका पूनम स्वामी यांचाही समाधानकारक अभ्यास नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांनाही यापुढे कंत्राटी तत्वावर कायम न ठेवण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी श्री. दिग्रसकर यांना केल्या आहेत. उमरा व शिरडशहरापूर येथील शाळा भेटीदरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना विद्यार्थ्यांचे अध्ययन फारच कमी असल्याचे तसेच गैरहजर शिक्षकांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांना दिलेत.
या दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी शिरड शहापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचीही पाहणी केली असून तेथील सेवांची स्थिती, रुग्ण संख्या आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती यांचीही चौकशी करण्यात आली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रसूतीचे प्रमाण वाढवावे, कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेची शिबिरे आयोजित करावीत. बाह्य रुग्णविभागातील रुग्णांना औषधींचा पुरवठा व्यवस्थित करावा. तसेच औषधांच्या ई-औषधी पोर्टलवर व्यवस्थित नोंदी ठेवाव्यात. परिसरातील नागरिकांना आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेल्या चाचण्यांचा पुरेपूर लाभ द्यावा, स्वच्छता ठेवावी. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे एक वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहील याची दक्षता घ्यावी. तसेच कोणतीही तक्रार येणार नाही याचीही दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी केल्या.
शासकीय सेवकांनी जबाबदारीने काम करावे, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला आहे.
***
किशोरवयीन जीवन कौशल्य कार्यक्रम अंतर्गत शालेय शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण
हिंगोली (जिमाका), दि. 23 : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय हिंगोली यांच्यातर्फे जिल्हा रुग्णालयातील डापकू सभागृहात आज जिल्ह्यातील शिक्षकांना किशोरवयीन जीवन कौशल्य कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डी. एस.चौधरी यांनी एचआयव्ही/एड्स व आजचा युवक याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. निशांत मानका यांनी युवकांचे मानसिक आरोग्य व व्यसनाधीनता यावर मार्गदर्शन केले. अनुराधा पथरोड यांनी किशोरवयीन जीवन कौशल्याविषयी तर श्रीमती लक्ष्मी वाठोरे यांनी गुप्तरोगाबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील विविध शाळेतील शिक्षक उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी संजय पवार, श्रीमती टीना कुंदणानी व आशिष पाटील यांनी परिश्रम घेतले.
***
शिवाजी महाविद्यालयातील रोजगार मेळाव्यात 112 उमेदवारांची प्राथमिक निवड
हिंगोली (जिमाका), दि. 23 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर व शिवाजी महाविद्यालय, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच येथील शिवाजी महाविद्यालयात "पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी व पदव्युत्तर या पात्रतेच्या 227 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 112 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.
या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील विविध नामांकीत कंपनीचे उद्योजक उपस्थित होते. तसेच जिल्ह्यात विविध महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी विविध महामंडळाचे स्टॉल लावण्यात आले होते.
या मेळाव्यात मार्गदर्शन करताना शिवाजी महाविद्यालय संस्थेचे सचिव प्रणव पवार यांनी युवक-युवतींनी शासनाच्या विविध योजनाचा लाभ घ्यावा, असे सांगितले. प्राचार्य डॉ.बी. एस. क्षीरसागर यांनी चांगल्या ठिकाणी आत्मविश्वासाने मुलाखत द्यावी व नोकरीची संधी मिळवून घ्यावी, असा संदेश दिला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सहायक आयुक्त बालाजी मरे यांनी रोजगार मेळाव्याचा हेतू विशद करताना म्हणाले, राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा हा एक योजनेचाच भाग आहे. यामध्ये जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना व स्थानिक पातळीवरील उद्योजक, महाराष्ट्रातील विविध कंपनीचे उद्योजक, रोजगार व स्वयंरोजगारासाठी इच्छूक उमेदवार तसेच शासनाच्या विविध महामंडळामार्फत चालणाऱ्या योजना या सर्वांना एकाच छताखाली एकत्र आणून रोजगार व स्वयंरोजगासाठी उमेदवारांनी संधी दिली जात असल्याची माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. धाराशीव शिराळे यांनी केले. या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता हिंगोली या कार्यालयाचे नवनाथ टोनपे, राजाभाऊ कदम, नागेश निरदुडे, रमेश जाधव, पवन पांडे, प्रवीण राठोड, अभिजीत अलोने आणि शिवाजी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.एस.यु.ढाले, डॉ.बी.एस. जाधव, डॉ.इक्बाल जावेद, अय्याज फारुकी व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
******
खासगी आस्थापनांनी शी बॉक्स पोर्टलवर नोंदणी करावी
हिंगोली (जिमाका), दि. 23 : केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयामध्ये 10 किंवा 10 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असलेल्या खासगी आस्थापना, कंपनी, एमआयडीसी कंपनी, मॉल, रेस्टारेंट्स, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, दुकाने, बँक, खासगी उपक्रम/संस्था, इंटरप्रायजेस, अशासकीय संघटना, सोसायटी, ट्रस्ट, उत्पादक, पुरवठा, वितरण व विक्री यासह वाणिज्य, व्यावसायिक, शैक्षणिक, करमणूक, औद्योगिक, आरोग्य इत्यादी सेवा किंवा वित्तीय कामकाज पार पाडणारे युनिट किंवा सेवा पुरवठादार रुग्णालये, सुश्रृषालये, क्रीडा संस्था, प्रेक्षागृहे, क्रीडा संकुले तसेच ईतर खासगी आस्थापना इत्यादी ठिकाणी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. तसेच त्याबाबतची माहिती ही महिला बाल विकास मंत्रालय, भारत सरकारच्या 'शी बॉक्स' या पोर्टलवर अंतर्गत तक्रार समितीची नोंद करण्यासाठी http://shebox.wcd.gov.in या वेबसाईटवर जाऊन होम स्क्रीनवर दाखविल्याप्रमाणे प्रायवेट हेड ऑफिस रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करुन आवश्यक त्या सर्व माहितीचा तपशिल भरुन सबमिट या टॅबवर क्लिक करुन अंतर्गत तक्रार समितीची माहिती नोंदविणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.
तसेच अधिनियमातील कलम 26 मध्ये नमूद केल्यानुसार "जर एखाद्या मालकाने (अ) अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली नाही, (ब) अधिनियमातील कलम 13, 14 किंवा 22 नुसार कार्यवाही केली नाही, (क) किंवा या कायद्यातील व नियमातील विविध तरतुदींचे व जबाबदाऱ्यांचे पालन न केल्यास मालकाला 50 हजार रुपयापर्यंत दंड होईल. तसेच हाच गुन्हा पुन्हा केल्यास आस्थापनेचा परवाना रद्द किंवा दुप्पट दंड अशी तरतूद आहे.
जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करून अथवा यापूर्वी समिती गठित केली असल्यास त्याबाबतची नोंद लवकरात लवकर शी बॉक्स पोर्टलवर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, एस-7, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, हिंगोली-431513 ई-मेल पत्ता : dwandcdoh@gmail.com येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
**
जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य टिळक यांना जयंतीनिमित्त अभिवादन
हिंगोली (जिमाका), दि. 23 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी, संतोष बोथीकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
******
22 July, 2025
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन
• 5 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक
• हिंगोली जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 22 : राज्य शासनाच्या वतीने दि. 27 ऑगस्ट, 2025 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2025' चे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत संस्था किंवा स्थानिक पोलीसाकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था याची परवानगी घेतलेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होऊ शकतात. दि. 20 जून, 2025 च्या शासन निर्णयात नमूद निकषाची पूर्तता करणाऱ्या, करु शकणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने करावयाच्या अर्जाचा नमुना शासन निर्णयातील परिशिष्ट अ येथे आहे. या गणेशोत्सव स्पर्धेत भाग घेणाऱ्या मंडळांपैकी मागील सलग दोन वर्षे राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय पारितोषिक प्राप्त झालेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पारितोषिकास पात्र ठरणार नाहीत. ही अट इतर मंडळांना संधी देण्याच्या उद्देशाने नमूद करण्यात आली आहे. या स्पर्धेचा अर्ज पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर दि. 20 जुलै 2025 पासून दि. 20 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन करावेत. शासन निर्णयातील निकषाची पूर्तता केलेल्या जिल्ह्यातून एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची जिल्हास्तरीय समितीकडून शिफारस करण्यात येईल.
राज्यातील पहिल्या तीन विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून राज्यस्तरीय परीक्षणात प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे प्रथम 5 लाख, द्वितीय 2.5 लाख आणि तृतीय क्रमांक आलेल्या गणेश मंडळाला 1 लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच अन्य जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांना 25 हजार रुपयाचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
या स्पर्धेत हिंगोली जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवण्याचे आवाहन जिल्हास्तरावरुन जिल्हा नियोजन अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
*****
चाईल्ड हेल्पलाईनकडून हिंगोली शहरातील इंदिरा चौक परिसरात जनजागृती
हिंगोली (जिमाका), दि. 22 : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार हिंगोली शहरातील इंदिरा चौक परिसरात चाईल्ड हेल्पलाइन 1098 कक्षाकडून जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात जिल्हा बाल सरंक्षण कक्ष व चाईल्ड हेल्पलाइन 1098 कक्षाकडून बालकासंदर्भात आणि बालकाशी निगडीत विविध विषयावर माहिती देण्यात आली. यामध्ये सुरक्षित स्पर्श ,असुरक्षित स्पर्श, बाल विवाह म्हणजे काय, विवाहाचे योग्य वय, बाल विवाह होण्याची कारणे याबाबत माहिती देण्यात आली.
आपल्या सभोवताली कुठेही बाल विवाह होत असेल तर चाईल्ड हेल्पलाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर माहिती दिली पाहिजे. 1098 हा बालकांकरीता तात्काळ मदत करणारी हेल्पलाईन आहे. या टोल फ्री क्रमांकावर मिळालेली माहिती गोपनीय असते. जेव्हा बालकाला मदतीची गरज असते त्यावेळी 1098 या टोल फ्री क्रमाकांवर संपर्क साधावा, अशी माहिती चाईल्ड हेल्पलाईन पर्यवेक्षक धम्मप्रिया पखाले व श्रीकांत वाघमारे यांनी दिली. बालक म्हणजे काय, बालकांचे हक्क व अधिकार याबाबत तसेच बालकांवर होणारे अन्याय अत्याचार थांबविण्यासाठी समुदायातील लोकांनी पुढाकार घेऊन माहिती दिली पाहिजे, असे सांगितले.
*****
शासनाच्या विविध योजनेचा लाभ देण्यासाठी ऊसतोड कामगारांचा सर्वे करावा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
• जिल्हाधिकारी श्री.गुप्ता यांनी घेतला समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा
हिंगोली (जिमाका), दि. 22 : शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी ऊसतोड कामगारांचा सर्वे करुन माहिती संकलीत करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज आयोजित आढावा बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती, जिल्हा ऊसतोड कामगार समिती, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. एस. बोराटे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडूरंग फोपसे, वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी भाकरे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीष रुणवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांच्यासह सर्व बैठकीचे समिती सदस्य उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील 7 हजार 672 ऊसतोड कामगारांची आरोग्य विभागामार्फत नुकतीच आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून ऊस तोड कामगारांची यादी उपलब्ध करुन घ्यावी. या यादीतील ऊसतोड कामगारासह राहिलेल्या ऊसतोड कामगारांचा सर्वे आशा व बचतगटाच्या गट समन्वयकामार्फत (सीरपी) करण्यात यावेत. यासाठी ऊसतोड कामगारासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्यावे आणि सर्व ऊसतोड कामगारांचा डाटा तयार करावा आणि त्यांना ई-श्रम कार्डासह शासनाच्या विविध योजनेचा लाभ द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले. तसेच त्यांनी साखर कारखाने, ऊसतोड कामगारांची माहिती, नोंदणी, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना, ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्य समस्या, गर्भवती महिला ऊसतोड कामगारांना पुरवण्यात येणाऱ्या सोईसुविधा आदी विषयावर चर्चा करण्यात आली.
तसेच जिल्हा दक्षता व समितीच्या बैठकीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अत्याचार पीडितांना अर्थसहाय्य देण्यासाठी प्राप्त प्रस्तावावर चर्चा करुन पात्र प्रकरणाला मंजुरी देण्यात आली. तसेच प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेत निवड केलेल्या गावामध्ये विविध विकासकामे करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
*****
21 July, 2025
सुशिक्षित बेरोजगारांसाठी आज रोजगार मेळाव्याचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर हिंगोली येथे उद्या, दि. 22 जुलै, 2025 प्लेसमेंट ड्राईव्ह/ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यात चैतन्या इंडिया फिन क्रेडिट प्रा.लि.औंढा नागनाथ, सॉपिओ ऑथालास्टिक प्रा.लि.हिंगोली, भारत फायनान्स लि.हिंगोली, एसबीआय लाईफ इन्शुरन्स हिंगोली, भारतीय जीवन विमा निगम हिंगोली इत्यादी कंपनी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ हिंगोली हे या प्लेसमेंट ड्राईव्ह/स्वयंरोजगार मेळाव्यामध्ये सहभाग घेणार आहेत.
यासाठी जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर या शैक्षणिक अर्हतेनुसार 120 पेक्षा अधिक रिक्तपदे विविध कंपनीत आहेत. स्वत: मूळ कागदपत्रासह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर हिंगोली येथे दि. 22 जुलै, 2025 रोजी सकाळी 10 वाजता स्वखर्चाने उपस्थित रहावे. या मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाचे सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी केले आहे.
*****
वसमत तालुक्यातील 16 गावातील रास्त भाव दुकानासाठी 30 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरावेत
हिंगोली (जिमाका), दि. 21 : वसमत तालुक्यातील नागापूर, फाटा, कुरंदवाडी, जुनुना, महमदपूरवाडी, डिग्रस खाजमापूरवाडी, भोरीपगाव, सातेफळ, पारवा/पळसगाव, वाघी, खंदारबन, माटेगाव, आरळ, परजना, कोनाथा, कोहिनूर कॉलनी, गोविंदनगर, वसमत शहरी अशा एकूण 16 रास्तभाव दुकानासाठी 30 ऑगस्ट, 2025 पर्यंत अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
याबाबतचे जाहीर प्रगटन तहसील कार्यालयामार्फत गावात डकवण्यात आलेले आहे. यासाठी भरावयाचे अर्ज तहसील कार्यालय, वसमत येथे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.
रास्तभाव दुकाने, किरकोळ केरोसीन परवाने दि. 6 जुलै, 2017 च्या शासन निर्णयानुसार पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था), नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वयंसहाय्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था या प्राधान्य क्रमानुसार मंजूर करण्यात येतील. ही रास्तभाव दुकाने व किरकोळ केरोसीन परवाने मंजूर केलेल्या दुकानाचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदायाद्वारे करणे आवश्यक राहील. अधिकृत स्वंय सहाय्यता गटांना प्राधिकारपत्राच्या अटी शर्तीच्या पालनार्थ भरावयाच्या प्रतिभूती ठेवीच्या रक्कमा चलनाव्दारे बँकेत शासन जमा नियमानुसार कराव्या लागतील. रास्तभाव दुकान, किरकोळ केरोसीन परवाने मंजूर करण्यासाठी प्राथ्यम्य सूची दि. 3 नोव्हेंबर, 2007 व दि. 25 जून, 2010 च्या शासन निर्णयानुसार विचारात घेतली जाईल.
प्राथम्यसुचीनुसार गटांची निवड करताना जेष्ठ, वर्धनक्षम व नियमित कार्यरत असलेल्या, अंतर्गत व्यवहार पारदर्शक व परतफेड चोख व नियमित असलेल्या व प्रतिवर्षी लेखापरिक्षण केलेल्या गटास प्राधान्य देण्यात येईल. निवड करावयाच्या गटाचे हिशोब व लेखे अद्यावत असावेत व परतफेडीचे प्रमाण किमान 80 टक्के असावे. आवेदन करणाऱ्या संस्थांनी दि. 3 नोव्हेंबर, 2007, दि. 6 जुलै, 2017 व 1 ऑगस्ट, 2017 या शासन निर्णयांचे वाचन करुन आवेदन पत्र अचूक भरावेत. अर्ज भरण्याची मुदत ही दिनांक 22 जुलै, 2025 ते 20 ऑगस्ट, 2025 पर्यंत तहसील कार्यालयात कार्यालयीन वेळेत विहित नमुन्यात स्वीकारण्यात येतील. वरील दाव्याचे पृष्ठीकरिता लेखी पुरावे सादर करणे आवश्यक आहे. स्वंय सहाय्यता बचत गटाची निवड करण्याचे काम जिल्हा पुरवठा अधिकारी अध्यक्ष असलेली शासन नियुक्त समिती (त्या गावच्या महिला ग्रामसभेची शिफारस विचारात घेऊन) करील. सदरहू जाहिरनाम्यामध्ये अशंतः किंवा पूर्णतः बदल करण्याचे अधिकार निम्न स्वाक्षरीकाराने राखून ठेवले आहेत, असे जिल्हा पुरवठा अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
*****
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध योजनेसाठी अर्ज करा
हिंगोली (जिमाका), दि.21 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या जिल्हा कार्यालय हिंगोली कार्यालयासाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजनेंतर्गत 90 व बीज भांडवल योजनेंतर्गत 90 कर्ज प्रकरणाचे तसेच थेट कर्ज योजनेंतर्गत 30 कर्ज प्रकरणाचे उद्दिष्ट आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील इच्छूक अर्जदाराने वरील योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑगस्ट, 2025 अखेर पर्यंत http://mahadisha.mpbcdc.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत. तसेच कार्यालयाशी संपर्क साधावा.
अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, कोटेशन, प्रकल्प अहवाल, व्यवसायाचा जागेचा पुरावा, दोन पासपोर्ट साईज फोटो, व्यवसायाचे लायसन्स इत्यादी कागदपत्राच्या छायांकित प्रतीसह दोन प्रतीत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. हिंगोली यांनी केले आहे.
*****
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत केंद्रवती अर्थसंकल्प योजनेचे ऑनलाईन अर्ज सादर करण्यास 31 जुलैपर्यंत मुदतवाढ
हिंगोली (जिमाका), दि.21 : केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युक्लिअस बजेट) योजनेंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षातील मंजूर आराखड्यातील योजना नुसार परभणी व हिंगोली जिल्ह्यातील योजनांसाठी इच्छुक सर्व आदिवासी लाभार्थ्याकडून शासनाच्या https://www.nbtribal.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्यास दिनांक 31 जुलै, 2025 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभार्थ्यांनी https://www.nbtribal.in या संकेतस्थळावरील योजनाचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयात ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी सुनिल बारसे यांनी केले आहे.
*****
विशेष लेख - मुख्यमंत्री सहायता कक्ष गरजु रुग्णांना मायेचा आधार हिंगोली जिल्ह्यात दिली सहा महिन्यात 6 लाख 10 हजारांची मदत
राज्यातील गोर-गरीब जनतेला दुर्धर आजारांवरील उपचारांचा खर्च भागविण्यासाठी विविध योजनांसोबतच तातडीच्या आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामार्फत राज्यभर प्रभावी अंमलबजावणी होत असून ही योजना गरजूसाठी मायेचा आधार बनली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एक संजीवनी ठरली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील जनतेलाही या उपक्रमाचा लाभ मिळावा व रूग्णांच्या नातेवाईकांना अर्थसहाय्य मिळविण्यासाठी मुंबईकडे पायपीट करावी लागू नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष सुरु करण्यात आला आहे. या कक्षामार्फत जानेवारी ते जुलै 2025 दरम्यान जिल्ह्यातील गरजु व पात्र रुग्णांना गंभीर व दुर्धर आजारावरील वैद्यकीय उपचारासाठी एकूण 7 गरजु रुग्णांना 6 लाख 10 हजार रुपयांचे अर्थ सहाय्य देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळविण्यासाठी संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांना मुंबई येथे अर्ज सादर करण्यास जावे लागत होते. त्यात बऱ्याच अडचणीही येत होत्या. ही अडचण दूर करून हिंगोली जिल्ह्यातील गोर गरीब रुग्णांना जिल्ह्यातच अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून जानेवारी 2025 मध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. हिंगोली येथे हा कक्ष कार्यान्वित झाल्यापासून जिल्ह्यातील गरजु व पात्र रूग्णांचे नातेवाईक गंभीर व दुर्धर आजारावरील वैद्यकीय उपचारासाठी अर्थसहाय्य मिळवण्यासाठी येतात व त्यांना कक्षाद्वारे सर्वतोपरी मदत करण्यात येते. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाकडून रुग्णावर उपचार करणाऱ्या संबंधित रुग्णालयास थेट वर्ग करण्यात येतो.
हिंगोली जिल्ह्यातील गरजु रुग्णांना जानेवारी ते आतापर्यंत 6 लाख 10 हजार रुपयांची मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाद्वारे जिल्ह्यातील सवंडकर नारायण मुंजाजी यांना 50 हजार, शांभवी गजानन सावळे यांना 2 लाख रुपये, सय्यद मुसा सय्यद रसूल यांना 50 हजार, सर्जेराव हंबीरराव ढोरे यांना 1 लाख रुपये, हिरालाल सुभाष पवार यांना 40 हजार रुपये, रामचंद्र मसाजी कुरवाडे यांना 1 लाख रुपये आणि शामराव किसनराव सुर्यवंशी यांना 70 हजार रुपये अशा एकूण 7 रुग्णांना 6 लाख 10 हजार रुपयाची मदत देण्यात आली आहे.
या आजारांसाठी मिळते मदत
मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेंतर्गत अर्थसहाय्य प्राप्त होण्यासाठी काही ठराविक आजार चिन्हित करण्यात आले आहेत. यामध्ये कॉकलियर ईम्प्लांट/अंतस्त कर्णरोपण शस्त्रक्रिया (वय ३ वर्षांपर्यंत), ह्रदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, मुत्रपिंड प्रत्यारोपण, फुप्फुस प्रत्यारोपण, अस्थी मज्जा प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, खुब्याचे प्रत्यारोपण, कर्करोग शस्त्रक्रिया, कर्करोग औषधोपचार, किरणोपचार, अस्थिबंधन, नवजात शिशुंचे संबंधित आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, रस्ते अपघात (दुचाकी), लहान बालकांच्या संबंधित शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, ह्रदयरोग, डायलिसीस, जळीत रुग्ण, विद्युत अपघात आणि विद्युत जळीत रुग्ण या आजाराचा समावेश आहे.
आवश्यक कागदपत्रे
विहित नमुन्यात अर्ज, वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र, रुग्ण खाजगी रुग्णालयात असल्यास खर्चाचे प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून प्रमाणित करणे, तहसील कार्यालयाचा वार्षिक 1 लाख 60 हजार रुपयापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला, रुग्णांचे आधार कार्ड व रेशन कार्ड महाराष्ट्राचे असावे. लहान बाळाच्या उपचारासाठी त्याच्या आईचे आधार कार्ड आवश्यक, संबंधित आजाराचे रिपोर्ट, अवयव प्रत्यारोपणासाठी झेडटीसीसी/फार्म-19, अपघातग्रस्त, भाजलेले रुग्ण, विद्युत अपघातग्रस्त रुग्ण यांच्यासाठी एफआयआर रिपोर्ट, पोलीस रिपोर्ट आवश्यक, रुग्णाचे ॲडमिट असलेले जिओ टॅग छायाचित्र आवश्यक आहे.
येथे करता येईल अर्ज
विहीत नमुन्यात मुळ अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह डॉ. नामदेव केंद्रे, वैद्यकीय अधिकारी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, दुसरा मजला, हिंगोली येथे सादर करणे आवश्यक आहे.अर्ज करण्यासाठी व अधिकच्या माहितीसाठी https://cmrf.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नामदेव केंद्रे (9850594181) यांच्याशी संपर्क साधावा.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाद्वारे गरजू व गोर गरीब जनतेला दुर्धर आजारावर उपचारासाठी आर्थिक मदत मिळत आहे. त्यामुळे कठीण प्रसंगात मुख्यमंत्री कार्यालय सर्वसामान्यांच्या भक्कमपणे पाठीशी असल्याने पालकत्वाच्या भूमिकेतील मुख्यमंत्री यांच्या विषयीचा विश्वास सामान्य जनतेमध्ये वृद्धींगत होत आहे.
- चंद्रकांत कारभारी
उसंपादक/माहिती सहायक,
जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली
******
19 July, 2025
राष्ट्रीय खाद्यतेल अभियान- तेलबिया काढणी पश्चात प्रक्रिया घटकाच्या अनुदानासाठी 31 जुलै पूर्वी अर्ज सादर करा
हिंगोली (जिमाका), दि. 19 : केंद्र व राज्य पुरस्कृत राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत सन 2025-26 या वर्षासाठी तेलबिया उत्पादनातील कार्यक्षमता वाढवण्यासाठी काढणी पश्चात पायाभूत सुविधा या घटकांतर्गत शासकीय खाजगी उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था, कंपनी (एफपीओएस) आणि सहकारी संस्था यांना अनुदान दिले जाणार आहे.
तेलबिया संकलन, तेल काढणे आणि तेल उत्पादन कार्यक्षमता वाढवणे तसेच सध्या कार्यरत पायाभूत सुविधांची क्षमता किंवा कार्यक्षमता सुधारण्यासह कापनीनंतरच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी व कापूस बियाणे, नारळ, तांदुळ कोंडा खाद्य दुय्यम स्त्रोताव्दारे तेल उत्पादनास प्रोत्साहन देणे हा उद्देश आहे. काढणीनंतरच्या मूल्य साखळीसाठी मदतीचे प्रमाण हे तेल काढणी युनिट (10 टन क्षमता) आणि तेलबियांवर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामग्री आणि उपकरणे, तेलबिया प्रक्रिया यूनिट या प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के कमाल 9 लाख 90 हजार रुपये यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार मुल्य साखळी भागीदार (व्हॅल्यू चैन पार्टनर) यांना विपणन व्यवस्था व प्रक्रिया उद्योगाशी जोडण्यासाठी या घटकांतर्गत मदतीसाठी मूल्य साखळी भागीदाराला प्राधान्य देण्यात येईल. या घटकांतर्गत जमीन आणि इमारतीसाठी सहाय्य दिले जाणार नाही किंवा प्रकल्प खर्चाची गणना करताना सदर खर्चाचा विचार केला जाणार नाही. ही बाब बँक कर्जाशी निगडीत आहे.
हिंगोली जिल्ह्यातील शासकीय खाजगी उद्योग, मूल्य साखळी भागीदार (व्हॅल्यू चैन पार्टनर), शेतकरी उत्पादक संस्था, कंपनी आणि सहकारी संस्थांनी फार्मर आयडी, आधारकार्ड व बँक खात्यांचा तपशील इत्यादी कागदपत्रे संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे दि. 31 जुलै, 2025 पूर्वी अर्ज सादर करावेत.
पूर्वसंमती देण्यात आलेल्या लाभार्थी संस्थांनी प्रकल्प पूर्ण केल्यानंतर त्यांना अनुज्ञेय असलेले अनुदान त्यांच्या बँक खात्यावर थेट लाभ हस्तांतर पध्दतीने वर्ग करण्यात येईल. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील योग्य शासकीय खाजगी उद्योग शेतकरी उत्पादक संस्था, कंपनी आणि सहकारी संस्था यांची निवड होण्यासाठी जास्तीत जास्त संस्थांनी सहभाग घ्यावा. अधिक माहितीसाठी कृषि विभागाच्या कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन राजेंद्र कदम, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे
*****
सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन
• 5 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक
हिंगोली (जिमाका), दि. 19 : पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2025' चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेचा अर्ज पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाईन पोर्टलद्वारेच दि. 20 जुलै 2025 पासून दि. 20ऑगस्ट 2025 पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. अपूर्ण अर्ज रद्द ठरविण्यात येतील.
ही स्पर्धा निःशुल्क असून सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन, संस्कृतीचे जतन व संवर्धन याकरिता राबविण्यात आलेले उपक्रम, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे यांविषयी जनजागरुकता तसेच जतन व संवर्धन, विविध सामाजिक उपक्रम व कार्ये, पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट, ध्वनिप्रदूषण रहित वातावरण गणेशभक्तासाठी केलेल्या सोयी सुविधा यांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि असेच समाजाभिमुख उपक्रम अधिकाधिक घडावेत म्हणून प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. याच निकषांच्या आधारे स्पर्धेचे परीक्षण केले जाईल.
27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांनी गठीत केलेली जिल्हास्तरीय समिती या स्पर्धेत सहभागी मंडळे किंवा संस्थांच्या उत्सव स्थळाला भेट देतील आणि जिल्हास्तरीय परीक्षण पूर्ण करतील. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे हे 4 जिल्हे प्रत्येकी 3 आणि हे 4 जिल्हे वगळता अन्य 32 अशा प्रत्येक जिल्ह्यातून एक यानुसार एकूण 44 शिफारसी राज्यस्तरीय परीक्षणासाठी स्वीकारल्या जातील. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सर्वांनी आपापल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
राज्यस्तरीय परीक्षणात प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे 5 लाख, 2.5 लाख आणि 1 लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच अन्य जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांना 25 हजार रुपयाचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभाग नोंदवण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री अँड. आशिष शेलार यांनी केले आहे.
*****
वसमत आयटीआयमध्ये नामांकित कंपनीमार्फत कॅम्पस इंटरव्यू
हिंगोली (जिमाका), दि. 19 : वसमत येथील स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये आजी-माजी विद्यार्थ्यांसाठी भारतातील नामांकित व्हर्लपूल कंपनीला बोलावून कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन करण्यात आलेले होते.
याप्रसंगी संस्थेचे प्राचार्य एस. एल. कोंडावार यांनी व्हर्लपूल कंपनीकडून आलेले कंपनीचे प्रतिनिधीचे स्वागत करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे मुलाखतीला सामोरे जाऊन या संधीचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले.
कंपनीचे प्रतिनिधी श्री. कोल्हे यांनी कंपनीच्या धोरणाबद्दल माहिती सांगितली तर श्री. काळे यांनी निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणारे वेतन, सोयीसुविधा व इतर भत्ते याची माहिती दिली. त्यानंतर संस्थेतील एक वर्ष व दोन वर्ष व्यवसायाच्या द्वितीय वर्षातील एकूण 51 विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून घेऊन मुलाखती घेण्यात आल्या. याचा अंतिम निकाल कंपनीमध्ये जाऊन घोषित करण्यात येणार आहे. त्यामुळे संस्थेतील एकूण जवळपास 45 ते 50 विद्यार्थ्यांची निवड निश्चित आहे.
या कॅम्पस इंटरव्यू दरम्यान संस्थेतील निदेशक जी. आर. कोरवार, जी. एन. येमेवार, आर. एन. कानगुले. एन. एस. सबनवार, एस. आर. पडघन, मुख्य लिपिक एस. आर. खूपसे, वरिष्ठ लिपिक श्रीमती आर. जे. शहारे, तसेच कार्यालयीन कर्मचारी ज्ञानेश्वर साळवे, नामदेव वाहेवळ व भालेराव यांनी सहकार्य केले.
*****
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची जिल्हा क्रीडा संकुलाला भेट
हिंगोली (जिमाका), दि.19 : जिल्ह्यात व शहरात क्रीडा वातावरण निर्मितीच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणे हा क्रीडा विभागाचा ध्येय आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी लिंबाळा मक्ता येथील जिल्हा क्रीडा संकुलातील निवासी प्रशिक्षणार्थी यांना नुकतीच भेट दिली. त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेतली आणि पोलीस भरतीत मिळविलेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले.
यानंतर जिल्हा क्रीडा संकुल समिती, हिंगोली द्वारा शहराच्या ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुल करिता चार ते पाच एकर शासकीय जागा निवड करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शहरात कार्यरत असलेले जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र इमारत व लॉन टेनिस क्रीडांगणाच्या बाजूला विस्तृत प्रमाणात असलेली जागेची पाहणी केली. ही जागा जिल्हा क्रीडा संकुलासाठी देण्याचा त्यांचा मानस आहे. या जागेची निवड अंतिम झाल्यानंतर त्या ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुल करिता अनुदान मर्यादेत वाढ या अनुषंगाने 15 कोटी रुपये बांधकाम अनुदान अनुज्ञेय आहे. या रकमेच्या अंदाजपत्रक व आराखड्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यानंतर अत्यावश्यक क्रीडा सुविधा जिल्हा क्रीडा संकुल समिती द्वारा निर्माण करण्यात येणार आहेत.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी आर. एस. मारावार, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, तलाठी वाबळे, संकुलाचे कर्मचारी वसीम, अर्जुन पवार व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
******
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी घेतला सखी वन स्टॉप सेंटरचा आढावा
हिंगोली (जिमाका), दि.19 : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी आज येथील महिला व बाल विकास विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या सखी वन स्टॉप सेंटरला भेट देऊन आढावा घेतला. या भेटी दरम्यान संकटात सापडलेल्या महिलांसाठी वन स्टॉप सेंटर 24x7 तास कार्यरत असून महिलांना एकाच छताखाली सुरक्षित निवारा, तात्काळ पोलीस मदत, समुपदेशन, वैद्यकीय सेवा, कायदेशीर सल्ला तसेच आवश्यकतेनुसार त्यांना त्यांच्या कुटुंबात पुनर्वसन करण्यात येते. सन 2019 पासून वन स्टॉप सेंटर कार्यरत असून आतापर्यंत 554 पीडित महिलांना लाभ देण्यात आलेला आहे.
यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस विभाग व सखी वन स्टॉप सेंटर यांच्याकडून कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियमा अंतर्गत तसेच संकटात सापडलेल्या महिलांच्या संदर्भात कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यापुढेही या कामकाजाची अशाच प्रकारे प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी संकटात सापडलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळावा याकरीता जास्तीत जास्त महिलांपर्यत सदर माहिती पोहचविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृण कोकाटे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संतोष दरपलवार, सहाय्यक लेखाधिकारी कमल शातलवार, विधी सल्लागार वर्षा पराते, कनिष्ठ संरक्षण अधिकारी नितीश मकासरे, राजेश पांडे, वन स्टॉप सेंटरचे केंद्र प्रशासक शिला रणवीर, समुपदेशक दिनेश पाटील, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*****
18 July, 2025
खरीपासाठी सुधारीत प्रधानमंत्री पिक विमा योजना सेनगाव तालुक्यातील जन सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र चालकांना सूचना
हिंगोली (जिमाका), दि. 18 : सुधारीत प्रधानमंत्री पिक विमा योजनेत विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीपासून शेतकऱ्यांना अधिक संरक्षण देण्याच्या दृष्टीकोनातून हिंगोली जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम विमा योजनेतील पिके खरीप ज्वारी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस या अधिसूचित पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने 2025 मध्ये घेतला आहे.
शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी केंद्र शासनाचे पीक विमा पोर्टल www.pmfby-gov.in सुरु करण्यात आले आहे. विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सीएससी केंद्रास रुपये 40 मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे. ते संबंधित विमा कंपनी मार्फत सीएससी केंद्रास दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रति अर्ज संबंधित अधिसूचित पिकासाठी अधिसूचित क्षेत्रातील रक्कम रुपये या प्रमाणे सीएससी केंद्र चालकांना देऊन अर्ज करावा. अतिरिक्त रक्कमेची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. जेणे करुन अशा सीएससी केंद्रचालकावर कायदेशीर कारवाई करता येईल. जास्त पैसाची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी आपली तक्रार टोल फ्री क्रमांक 14447 यावर करावी. तसेच कोणत्याही सीएससी केंद्र चालकांने अथवा शेतकऱ्यांने शासकीय जमीन, शासकीय गायरान, मंदीर, देवस्थान, संस्थान जमीन अथवा दुसऱ्या शेतकऱ्याचा परस्पर पीक विमा उत्तरवू नये. अशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशा सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बाबी :
अंतिम मुदत 31 जुलै 2025 आहे. योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याचा अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक आणि ई- पीक पाहणी बंधनकारक आहे. अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके सर्व शेतकरी या योजनेत भाग घेऊ शकतात. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक आहे. ई-पीक पाहणी. विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास विमा अर्ज रद्द होईल. भरलेला विमा हप्ता जप्त होतो. विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सीएससी विभागास रुपये 40 मानधन केंद्र शासनाने निर्धारीत करून दिले आहे. ते संबंधित विमा कंपनीमार्फत सीएससी विभागास दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा विमा हप्ता व्यतिरिक्त इतर शुल्क सीएससी चालकांना देऊ नये. एखाद्या अर्जदाराने बोगस किवा फसवणूक करून विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना पुढील किमान पाच वर्ष काळ्या यादीत टाकून शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. सर्व पिकांसाठी जोखीमस्तर 70 टक्के आहे.
विमा संरक्षणाच्या बाबी :
योजनेअंतर्गत खरीप व रब्बी हंगामाकरिता पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबींमुळे हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोग आधारे, तांत्रिक उत्पादना आधारे, सदर महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरुन नुकसान भरपाई देय राहील.
विमा योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांने हे करावे
अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यास या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही, मात्र त्यासाठी शेतकऱ्याने विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांकाच्या आधी किमान 7 दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळवणे गरजेचे आहे.
बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक, सातबारा उतारा, बँक पासबूक, आधार कार्ड आणि पीक पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेवून प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देवून व हप्ता भरुन सहभाग घ्यावा. या शिवाय कॉमन सर्विस सेंटर (सीएससी) आपले सरकारच्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता.
योजनेच्या माहितीसाठी संपर्क :
पीक विमा योजनेच्या अधिक माहितीसाठी किंवा नुकसान भरपाई माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषि रक्षक पोर्टल हेल्पलाईन 14447 वर संपर्क करावा. संबंधित विमा कंपनी, स्थानिक कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.
नियुक्त विमा कंपनी :
हिंगोली जिल्ह्याकरिता भारतीय कृषि विमा कंपनी, पत्ता : मुंबई क्षेत्रीय कार्यालय, लोकचेंबर्स, मरोळ मरोशी रोड, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-400059, ई-मेल : pikvima@aicofindia.com , सेनगाव तालुका विमा प्रतिनिधी गणेश वाव्हळ मो. 8381050606 यांची खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 या एक वर्षासाठी निवड करण्यात आलेली आहे.
पीक विम्याच्या तक्रार निवारण व नोंद करण्यासाठी संदीप वळकुंडे, तालुका कृषी अधिकारी, सेनगाव (मो. 8999235401) यांच्याशी संपर्क साधावा.
ज्वारी या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी 33 हजार रुपये असून शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता 82.50 रुपये आहे. सोयाबीन या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी 58 हजार रुपये असून शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता 1160 रुपये आहे. मूग या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी 26 हजार रुपये असून शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता 65 रुपये आहे. उडीद या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी 25 हजार रुपये असून शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता 62.50 रुपये आहे. तूर या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी 43 हजार रुपये असून शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता 430 रुपये आहे. कापूस या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी 60 हजार रुपये असून शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता 600 रुपये आहे.
योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत दि. 31 जुलै, 2025 आहे. परंतु सर्व शेतकऱ्यांनी अंतिम दिनांकाची वाट न पाहता अधिसूचित पिकांची माहिती घेऊन विहित मुदतीमध्ये नजीकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक, वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून आपल्या पिकाचा पीक विमा उतरवून घ्यावा, असे आवाहन सखाराम मांडवगडे, तहसीलदार तथा तालुकास्तरीय पीक विमा समिती, सेनगाव यांनी केले आहे.
*****
खरीपासाठी सुधारीत प्रधानमंत्री पिक विमा योजना औंढा ना. तालुक्यातील जन सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र चालकांना सूचना
हिंगोली (जिमाका), दि. 18 : सुधारीत प्रधानमंत्री पिक विमा योजनेत विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीपासून शेतकऱ्यांना अधिक संरक्षण देण्याच्या दृष्टीकोनातून हिंगोली जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम विमा योजनेतील पिके खरीप ज्वारी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस या अधिसूचित पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने 2025 मध्ये घेतला आहे.
शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी केंद्र शासनाचे पीक विमा पोर्टल www.pmfby-gov.in सुरु करण्यात आले आहे. विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सीएससी केंद्रास रुपये 40 मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे. ते संबंधित विमा कंपनी मार्फत सीएससी केंद्रास दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रति अर्ज संबंधित अधिसूचित पिकासाठी अधिसूचित क्षेत्रातील रक्कम रुपये या प्रमाणे सीएससी केंद्र चालकांना देऊन अर्ज करावा. अतिरिक्त रक्कमेची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. जेणे करुन अशा सीएससी केंद्रचालकावर कायदेशीर कारवाई करता येईल. जास्त पैसाची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी आपली तक्रार टोल फ्री क्रमांक 14447 यावर करावी. तसेच कोणत्याही सीएससी केंद्र चालकांने अथवा शेतकऱ्यांने शासकीय जमीन, शासकीय गायरान, मंदीर, देवस्थान, संस्थान जमीन अथवा दुसऱ्या शेतकऱ्याचा परस्पर पीक विमा उत्तरवू नये. अशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशा सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बाबी :
अंतिम मुदत 31 जुलै 2025 आहे. योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याचा अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक आणि ई- पीक पाहणी बंधनकारक आहे. अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके सर्व शेतकरी या योजनेत भाग घेऊ शकतात. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक आहे. ई-पीक पाहणी. विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास विमा अर्ज रद्द होईल. भरलेला विमा हप्ता जप्त होतो. विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सीएससी विभागास रुपये 40 मानधन केंद्र शासनाने निर्धारीत करून दिले आहे. ते संबंधित विमा कंपनीमार्फत सीएससी विभागास दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा विमा हप्ता व्यतिरिक्त इतर शुल्क सीएससी चालकांना देऊ नये. एखाद्या अर्जदाराने बोगस किवा फसवणूक करून विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना पुढील किमान पाच वर्ष काळ्या यादीत टाकून शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. सर्व पिकांसाठी जोखीमस्तर 70 टक्के आहे.
विमा संरक्षणाच्या बाबी :
योजनेअंतर्गत खरीप व रब्बी हंगामाकरिता पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबींमुळे हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोग आधारे, तांत्रिक उत्पादना आधारे, सदर महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरुन नुकसान भरपाई देय राहील.
विमा योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांने हे करावे
अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यास या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही, मात्र त्यासाठी शेतकऱ्याने विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांकाच्या आधी किमान 7 दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळवणे गरजेचे आहे.
बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक, सातबारा उतारा, बँक पासबूक, आधार कार्ड आणि पीक पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेवून प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देवून व हप्ता भरुन सहभाग घ्यावा. या शिवाय कॉमन सर्विस सेंटर (सीएससी) आपले सरकारच्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता.
योजनेच्या माहितीसाठी संपर्क :
पीक विमा योजनेच्या अधिक माहितीसाठी किंवा नुकसान भरपाई माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषि रक्षक पोर्टल हेल्पलाईन 14447 वर संपर्क करावा. संबंधित विमा कंपनी, स्थानिक कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.
नियुक्त विमा कंपनी :
हिंगोली जिल्ह्याकरिता भारतीय कृषि विमा कंपनी, पत्ता : मुंबई क्षेत्रीय कार्यालय, लोकचेंबर्स, मरोळ मरोशी रोड, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-400059, ई-मेल : pikvima@aicofindia.com , औंढा नागनाथ तालुका विमा प्रतिनिधी पवन गायकवाड मो. 8308889773 यांची खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 या एक वर्षासाठी निवड करण्यात आलेली आहे.
पीक विम्याच्या तक्रार निवारण व नोंद करण्यासाठी शिवप्रसाद सखाराम संगेकर, तालुका कृषी अधिकारी, औंढा नागनाथ (मो. 8408840487) यांच्याशी संपर्क साधावा.
ज्वारी या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी 33 हजार रुपये असून शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता 82.50 रुपये आहे. सोयाबीन या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी 58 हजार रुपये असून शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता 1160 रुपये आहे. मूग या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी 26 हजार रुपये असून शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता 65 रुपये आहे. उडीद या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी 25 हजार रुपये असून शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता 62.50 रुपये आहे. तूर या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी 43 हजार रुपये असून शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता 430 रुपये आहे. कापूस या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी 60 हजार रुपये असून शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता 600 रुपये आहे.
योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत दि. 31 जुलै, 2025 आहे. परंतु सर्व शेतकऱ्यांनी अंतिम दिनांकाची वाट न पाहता अधिसूचित पिकांची माहिती घेऊन विहित मुदतीमध्ये नजीकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक, वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून आपल्या पिकाचा पीक विमा उतरवून घ्यावा, असे आवाहन हरीष गाडे, तहसीलदार तथा तालुकास्तरीय पीक विमा समिती, औंढा नागनाथ यांनी केले आहे.
*****
शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी उंच भरारी शेतकऱ्यांना परदेश अभ्यास दौऱ्याची सुवर्णसंधी
हिंगोली (जिमाका), दि. 18 : विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी त्याचा केलेला अवलंब व त्याव्दारे त्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रीय भेटी तसेच संस्थांना भेटी इत्यादीव्दारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरिता राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यासाठी कृषि विभागाने राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे-राज्य पुरस्कृत योजना सन 2025-26 ही योजना आयोजित केली आहे, त्यानुसार सन 2025-26 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत युरोप, नेदरलँडस, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स, इस्त्राईल, जपान, मलेशिया, व्हिएतनाम व फिलीपाइन्स, चीन व दक्षिण कोरिया इत्यादी संभाव्य देशांची निवड करण्यात आली आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हयातून किमान एक महिला शेतकऱ्याची, विविध कृषि पुरस्कार प्राप्त व पीक स्पर्धा विजेते शेतकरी आणि इतर शेतकरी निवड करावयाचे आहेत. कृषि विभागामार्फत निवड केलेल्या शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्याच्या एकूण खर्चाच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपये यापैकी जे कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय आहे. निवड झाल्यास दौऱ्याच्या एकूण खर्चाच्या 50 टक्के किंवा एक लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती वगळून उर्वरित रक्कम प्रवासी कंपनीकडे आगाऊ भरणा करणे बंधनकारक आहे. सदरची रक्कम शेतकऱ्याने कॅशलेस पध्दतीने त्यांच्या आधार क्रमांकाशी निगडीत स्वतःच्या बँक खात्यातून एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस, धनाकर्ष किंवा धनादेशाव्दारे प्रवासी कंपनीस अदा करणे आवश्यक राहील. शेतकऱ्यांना देय असलेले 50 टक्के शासकीय अनुदान कमाल एक लाख रुपये अभ्यास दौरा पूर्ण करुन परत आल्यानंतर व आवश्यक ती कागदपत्रे (प्रवासाचे विमान तिकीट बोर्डींग पास, शेतकऱ्यांचे दौऱ्याबाबत सकारात्मक अभिप्राय इ.) दौऱ्यासोबत असणाऱ्या अधिकाऱ्यांकडे जमा केल्यानंतरच प्रवासी कंपनीच्या बँक खात्यात कृषि आयुक्तालयमार्फत जमा करण्यात येईल.
हिंगोली जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी आपले अर्ज वैध पारपत्रधारक (Passport), फार्मर आयडी, सातबारा, 8 अ, आधारकार्ड, शिधापत्रिका व बँक खात्यांचा तपशील इत्यादी कागदपत्रे संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे दि. 25 जुलै, 2025 पूर्वी अर्ज सादर करावेत. प्राप्त अर्जामधून सोडत काढून निवड करण्यात येणार आहे. या अभ्यास दौऱ्याचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा व अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारो कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन राजेंद्र कदम, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
******
हिंगोली जिल्ह्यांमध्ये सेवादूत प्रणालीचा शुभारंभ
• सेवादूत प्रणालीद्वारे सेवा देणारा हिंगोली जिल्हा हा मराठवाड्यातील पहिला जिल्हा ठरला-जिल्हाधिकारी
हिंगोली (जिमाका), दि. 18 : जिल्हा प्रशासनातर्फे विकसित करण्यात आलेल्या सेवादूत या प्रणालीचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते आज जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात शुभारंभ करण्यात आला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, तहसीलदार आश्विनकुमार माने आदी उपस्थित होते.
या प्रणालीद्वारे आपल्या जिल्ह्यातील जनतेला शासनाव्दारे राबविण्यात येणा-या विविध सेवा, कागदपत्रे घरपोच देण्यात येणार आहे. या प्रणालीच्या वापर करून हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला हवी असलेली कागदपत्रे आपल्या घरीच मिळविता येतील. त्यासाठी त्यांना Sewadoothingoli.in या संकेतस्थळावर जाऊन स्वतःची नोंदणी करून हवी असलेली सेवा घेण्यासाठी नोंदणीकृत असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र चालक यांच्याकडून विकल्प निवडून माहिती भरायची आहे.
ही माहिती भरल्यानंतर नोंदणीकृत आपले सरकार सेवा केंद्र चालक आपल्याला फोन करून आपण निवडलेल्या वेळेस व दिवशी आपल्या घरी येऊन आपण निवडलेल्या सेवेसाठी सर्व प्रक्रिया आपल्या घरीच पूर्ण करून घेईल तसेच निवडलेल्या सेवेसाठी लागणाऱ्या शुल्काची आणि कागदपत्रांची माहिती सुद्धा आपल्याला नोंदणी करत असतानाच मिळणार आहे. तेवढेच शुल्क आपणास आपल्या घरी येणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्र धारकाला द्यावयाचे आहे. त्याचप्रमाणे आपण निवडलेली प्रमाणपत्रे शासनाच्या नियमानुसार तयार झाल्यानंतर आपल्या घरी तोच आपले सरकार सेवा केंद्राधारक घरपोच आणून देईल.
या प्रणालीमुळे लोकांचा वेळ आणि होणारा त्रास तसेच वारंवार आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन होणारा मनस्ताप थांबवता येईल.
ही सेवा शहरी भागातील नगर परिषद भागातील लोकांसाठी पुढील आठवड्यामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशी सेवा देणारा हिंगोली जिल्हा हा मराठवाड्यातील पहिला जिल्हा ठरणार आहे. या प्रणालीचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी केले.
त्याचप्रमाणे अल्पावधीत व्हाट्सअपच्या माध्यमातून सुद्धा ही सेवा नागरिकांना लवकरच मिळणार असून राज्यातला हा पहिलाच प्रयोग ठरणार असल्याचेही यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले.
*****
विशेष लेख - मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष : गंभीर आजारपणात मदतीचा हात
जिल्ह्यातील कोणताही गरजू रुग्ण केवळ पैशाअभावी उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या गरजा भागवण्यासाठी शासनाच्या विविध योजना कार्यरत आहेत. त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी होय. ही योजना महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येते आणि या अंतर्गत गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या गरजू रुग्णांना ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष’ या यंत्रणेमार्फत आर्थिक मदत दिली जाते.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एक जीवनदायिनी ठरली आहे. राज्य शासनाचा हा उपक्रम गरजू रुग्णांना आरोग्याच्या क्षेत्रात ‘मूलभूत हक्क’ बहाल करणारा आहे. गरजूंना उपचार मिळावेत आणि कोणताही व्यक्ती केवळ पैशाअभावी मरण पावू नये, ही या योजनेमागची खरी भावना आहे. गरीब व गरजू रुग्णांना कर्करोग, हृदयविकार, मूत्रपिंडाचे विकार, मेंदूशी संबंधित आजार यांसारख्या गंभीर आजारांवर उपचार करताना लाखो रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे त्यांना महागड्या उपचारांचा खर्च परवडत नाही. हे लक्षात घेता, राज्य शासनाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष स्थापन केला आहे. या कक्षामार्फत रुग्णाच्या आजारानुसार 50 हजार ते 3 लक्ष रुपयांपर्यंतची मदत केली जाते.
या कक्षाची कार्यप्रणाली ही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष आरोग्य विभागामार्फत मंत्रालयात कार्यरत आहे. गरजू रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाइकांनी आवश्यक कागदपत्रांसह निधीसाठी अर्ज करावा लागतो. ही यंत्रणा पुढीलप्रमाणे कार्य करते:
रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक मंत्रालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षात किंवा संबंधित जिल्हा सामान्य रुग्णालयातून अर्ज सादर करू शकतात. त्यानंतर अर्जासोबत दिलेल्या वैद्यकीय व आर्थिक कागदपत्रांची तपासणी करण्यात येते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीमार्फत रुग्णाच्या आजाराची गंभीरता आणि उपचाराचा खर्च याचे मूल्यांकन केले जाते. संबंधित रुग्णाचा अर्ज वैध असल्यास या समितीकडून निधी मंजूर केला जातो आणि थेट संबंधित रुग्णालयाकडे वर्ग केला जातो.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविण्यासाठी अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा. त्याचे आर्थिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी (साधारणतः १ लाख ते १.५ लाख रुपये वार्षिक) असावे. अर्जदाराकडे बीपीएल किंवा अंत्योदय कार्ड असणे फायदेशीर ठरते. केवळ गंभीर आजारांवर उपचारासाठी या कक्षाकडूनही मदत मिळते.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाकडून रुग्णाला आर्थिक मदत मिळविण्यासाठी रुग्ण अथवा त्याच्या नातेवाईकाला रुग्णाचे अर्जपत्र, डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल, संबंधित रुग्णालयाचा खर्चाचा तपशील, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि रुग्णालयाचे नोंदणीकृत बँक खाते तपशील सोबत जोडावा लागतो.
या कक्षामार्फत योजनेचा लाभ मिळवण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात संपर्क करावा किंवा 'आपले सरकार सेवा केंद्र' किंवा 'सेतू केंद्र' येथे ही माहिती मिळते. तसेच मंत्रालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षात थेट अर्ज सादर करणे हा अर्ज आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाकडून रुग्णाला उपचाराला थेट रुग्णालयात वर्ग करण्यात येतो. हा निधी रुग्णाच्या नावे नव्हे तर संबंधित रुग्णालयाकडे वर्ग केला जातो. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून तो देताना हृदय प्रत्यारोपण, मूत्रपिंड प्रत्यारोपण, कर्करोग यांसारख्या महागड्या उपचारांवर भर देत गंभीर आजारांसाठी प्राधान्य दिले जाते. हा निधी शासकीय व खाजगी अशा दोन्ही प्रकारच्या नोंदणीकृत रुग्णालयांसाठी लागू असून, अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ७–१५ दिवसांत तो वितरीत केला जातो.
शासनाने जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील गरजू रुग्णांना जिल्ह्यातच मदत मिळणे सोयीचे झाले आहे. मदतीसाठी डॉ. नामदेव केंद्रे, वैद्यकीय अधिकारी, मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, दुसरा मजला, हिंगोली येथे संपर्क साधता येईल.
- जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली
***
17 July, 2025
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा हिंगोली दौरा
हिंगोली (जिमाका), दि.17: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ह्या दि. 18 व 19 जुलै, 2025 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दि. 18 जुलै, 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता जालनावरुन हिंगोलीकडे प्रयाण. रात्री 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व मुक्काम.
शनिवार, दि. 19 जुलै, 2025 रोजी सकाळी 10 वाजता हिंगोली येथे वन स्टॉप सेंटरला भेट व आढावा. दुपारी 1.30 वाजता हिंगोलीवरुन परभणीकडे प्रयाण.
*****
जिल्हा व सत्र न्यायालयात आंतरराष्ट्रीय न्याय दिन साजरा
हिंगोली (जिमाका), दि.17: तालुका विधी सेवा समिती व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा तालुका विधी समितीचे अध्यक्ष टी. एस. अकाली यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा व सत्र न्यायालयात आंतरराष्ट्रीय न्याय दिवस साजरा करण्यात आला. तसेच इतर विषयावर कायदेविषयक शिबीराचे आयोजन वकील संघ जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली येथे करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक अॅड. साहेबराव सिरसाठ यांनी वाढती लोकसंख्या यावर होणारे दुष्परिणाम व त्यावर उपाय यावर उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. अॅड. अजय उर्फ बंटी देशमुख यांनी न्याय दिवसानिमित्त मार्गदर्शन केले. तसेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर विनोद एम. मानखैर यांनीही उपस्थित पक्षकारांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. ए. अकाली यांनी आंतरराष्ट्रीय न्याय दिवस, वाढत चाललेली लोकसंख्या तसेच मध्यस्थीतून प्रकरणे निकाली काढल्यावर होणारे फायदे यावर सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बार कॉन्सील ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाचे सदस्य अॅड. सतीष देशमुख, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सुनिल भुक्तार हे होते. यावेळी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर वि. म. मानखैर, मुख्य न्याय दंडाधिकारी अ. बा. कुरणे, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व्ही. व्ही. सावरकर, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पी. आर. पमनानी, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर डी. व्ही. भंडारी, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एस. एस. पळसुळे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हा वकील संघाचे सचिव ॲड. अखील अहेमद यांनी केले. तर आभार प्रदर्शन जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सुनिल भुक्तार यांनी केले.
या कार्यक्रमास जिल्हा वकील संघाचे ज्येष्ठ विधीज्ञ तसेच पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******
नागरिकांनी समाजमाध्यमे वापरताना काळजी घ्यावी -जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
• एक चूक आपले बँक खाते करू शकते रिकामे
• आपले छायाचित्र वापरून होऊ शकते फसवणूक किंवा बदनामी
हिंगोली (जिमाका), दि.17: जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, खास करून महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी त्यांची समाजमाध्यमांची खाती ही द्विस्तरीय सुरक्षित ठेवून सायबर चोरट्यांपासून स्वत:ला सुरक्षित ठेवता येते. त्यासाठी खाती सुरक्षित ठेवण्यासोबतच नातेवाईकांशी संपर्क साधून खात्री केल्याशिवाय कोणतेही आर्थिक व्यवहार न करण्याचे किंवा बदनामीपासून वाचण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
जिल्ह्यातील मोठ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याचे एक फेक समाजमाध्यम खाते तयार करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली असून, त्यांचे फेक खाते संबंधित विभागाने तात्काळ बंद केले आहे. त्यामुळे नागरिकांनी तात्काळ आपापली खाती टू स्टेप व्हेरिफिकेशन करून सुरक्षित करावीत, असे आवाहनही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
सायबर चोर आपल्या नावाचे फेक खाते समाजमाध्यमांवर तयार करून आपल्या आप्तेष्ठांना, नातेवाईकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून फसवणूक करू शकतात. तसेच आपले नातेवाईक आजारी आहेत. आपल्या खाते अपडेट करायचे आहे, केवायसी अपडेट करायची आहे किंवा इतरही काही कारणे सांगून आपली ओटीपीमार्फत फसवणूक केली जावू शकते. तसेच आपले फेसबूक, ट्वीटर, इन्स्टाग्राम यासह विविध समाजमाध्यमांवर आपले छायाचित्र वापरून नवे खाते तयार करून आपल्या मित्रांना, नातेवाईकांना विविध कारणांच्या माध्यमातून पैशांची मागणी करू शकतात. त्यामुळे वेळीच सावध होऊन आपल्या नातेवाईकांशी थेट संपर्क साधून खात्री करून घ्यावी. त्यानंतरच पुढील आर्थिक वा इतर व्यवहार करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
जिल्ह्यातील नागरिकांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पीएम किसान लिस्टच्या एपीके फाईल येत असून या लिंकवर क्लिक केल्यास ते हॅक होत आहेत. तसेच मोबाईलमध्ये असलेले फोन पे अॅप, गुगल पे अॅप तसेच बँकेचे इतर अॅप्लीकेशनही हॅक होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा फसवणुकीपासून सावध राहणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले आहे.
सायबर चोरट्यांपासून नागरिकांनी घ्यावयाची काळजी
कोणत्याही एपीके फाईल मोबाईलमध्ये डाऊनलोड करू नका. तसेच थर्ड पार्टी ॲप डाऊनलोड करू नयेत. आपल्या व्हॉट्सअप अॅपला टू स्टेप वेरिफिकेशन कोड लावून ठेवावा जेणेकरून ते दुसरीकडे उघडणार नाहीत. तसेच आपले इंस्टाग्राम अकाउंट, फेसबुक अकाउंट यांना प्रोफाईल लॉक करून ठेवावे. आपल्या बँक खात्याचा, यूपीआय, डेबीट कार्ड, क्रेडीट कार्डचा क्रमांक तसेच इतर कोणताही ओटीपी अनोळखी व्यक्तींना सांगू नये.
आपले आर्थिक नुकसान झाल्यास तात्काळ 1930 अथवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली तक्रार द्यावी अथवा जवळचे पोलिस स्टेशन किंवा सायबर सेल, हिंगोली येथे संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
ऑनलाईन गेमींग अॅपपासून सावधान..!
ऑनलाईन गेमच्या माध्यमातून पैसे जिंकण्याचे अमिष दाखविले जाते. या अमिषाला मोबाईलधारक बळी पडतो. तो मोह टाळावा. अॅप डाउनलोड करताना ॲटो रीड ओटीपीची परवानगी दिली आहे. त्यामुळे आपल्या खात्यातून कल्पना नसतांनाही पैसे कमी होतात. अशा बनावट अॅपच्या माध्यमातून आपली फसवणूक टाळण्यासाठी असे मोफत ऑनलाईन गेमींग अॅप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू नका.
प्रतिबंधात्मक उपाय
फेसबुक, व्हॉट्स ॲप, ट्वीटर, इंस्टाग्राम इ. सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर अनोळखी व्यक्तींची मैत्री स्वीकारू नका तसेच आपली स्वतःची व कुटूंबाची माहिती शेअर करणे टाळा. ऑनलाईन मॅट्रीमोनीअल साईटवरील व्यक्तींना कोणतीही माहिती देऊ नका. आपल्या मोबाईलमध्ये अनोळखी अॅप डाउनलोड करू नका. अनोळखी फोन कॉलवर आपली वैयक्तीक अथवा आपल्या बँक खात्याची माहिती देऊ नका. तसेच आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी कोणालाही शेअर करू नका. अनोळखी व्यक्तीने पाठविलेला कोणताही क्यूआर कोड स्कॅन करू नका. इंटरनेटवरील नोकरीसंदर्भात विशेषतः विदेशातील नोकरी संधीच्या जाहिरातीची खात्री करा त्यांना आपली कोणतीही वैयक्तीक माहिती देऊ नका व आर्थिक व्यवहार करू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
***
Subscribe to:
Posts (Atom)