08 July, 2025
धरणग्रस्तांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील -- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली(जिमाका), दि.08: धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त बाधित गावातील नागरिकांचे मूलभूत प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत सांगितले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त नागरिकांची आढावा बैठक घेऊन त्यांच्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील धरणांमुळे पुनर्वसित झालेल्या गावांचा सर्वे करुन रस्ते, शाळा, समाज मंदिर आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच धरणग्रस्तांच्या अडचणीचे निराकरण करण्यात येईल. सोबतच धरणग्रस्तांना प्रमाणपत्र, शासकीय नोकरीत आरक्षण याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात येतील. डिजिटल रेकॉर्ड उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात येतील, असे सांगून प्रमाणपत्र हस्तांतरणाबाबत योग्य तो प्रस्ताव द्यावा. आपला प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल. धरणग्रस्तांनी मांडलेल्या समस्याचे, अडचणींचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.
या बैठकीस धरणग्रस्त बाधित शेतकरी, नागरिक उपस्थित होते.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment