23 July, 2025

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य टिळक यांना जयंतीनिमित्त अभिवादन

हिंगोली (जिमाका), दि. 23 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी, संतोष बोथीकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. ******

No comments: