25 July, 2025

रेड रिबन क्लब महाविद्यालयातील नोडल अधिकारी यांची एचआयव्ही/एड्स विषयक कार्यशाळा संपन्न

हिंगोली (जिमाका), दि. 25: जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयातील जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षामार्फत डापकू सभागृहात जिल्ह्यातील रेड रिबन क्लब महाविद्यालयातील सर्व नोडल अधिकारी व पिअर एज्युकेटर यांची एचआयव्ही/एड्स विषयी आज कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डी. एस. चौधरी यांनी एचआयव्हीला हद्दपार करण्यासाठी युवकांची भूमिका सर्वात महत्वाची असल्याने त्यांना एचआयव्ही/एड्स याविषयी माहिती असणे किती गरजेचे आहे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच रेड रिबन क्लब अंतर्गत महाविद्यालय स्तरावर वर्षभर घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी संजय पवार, श्रीमती टीना कुंदणानी व आशिष पाटील यांनी परिश्रम घेतले. ******

No comments: