23 July, 2025

किशोरवयीन जीवन कौशल्य कार्यक्रम अंतर्गत शालेय शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण

हिंगोली (जिमाका), दि. 23 : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय हिंगोली यांच्यातर्फे जिल्हा रुग्णालयातील डापकू सभागृहात आज जिल्ह्यातील शिक्षकांना किशोरवयीन जीवन कौशल्य कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डी. एस.चौधरी यांनी एचआयव्ही/एड्स व आजचा युवक याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. निशांत मानका यांनी युवकांचे मानसिक आरोग्य व व्यसनाधीनता यावर मार्गदर्शन केले. अनुराधा पथरोड यांनी किशोरवयीन जीवन कौशल्याविषयी तर श्रीमती लक्ष्मी वाठोरे यांनी गुप्तरोगाबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील विविध शाळेतील शिक्षक उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी संजय पवार, श्रीमती टीना कुंदणानी व आशिष पाटील यांनी परिश्रम घेतले. ***

No comments: