28 July, 2025

वायू प्रदूषण प्रमाणपत्र संपलेल्या वाहनांनी नूतनीकरण करुन घ्यावेत

• वैधता संपलेल्या वाहनावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्हाधिकारी यांनी आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार हिंगोली जिल्ह्यातील वायू प्रदूषण प्रमाणपत्राची वैधता संपलेल्या वाहनावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय मोटार अधिनियम 1989 मधील कलम 115 (7) अन्वये सर्व वाहनधारकाचे वायू प्रदूषण प्रमाणपत्र वैध असणे आवश्यक आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी आपल्या वाहनाचे वायू प्रदूषण नूतनीकरण लवकरात लवकर करुन घ्यावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे यांनी केले आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत वैधता संपलेल्या वाहनाविरुद्ध दि. 30 जुलै, 2025 पासून विशेष तपासणी मोहीम सुरु करुन पीयुसी समाप्त झालेल्या वाहनावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मोटार सायकल, तीन चाकीच्या वाहन मालकाला एक हजार व वाहनचालकाला एक हजार तर चारचाकी व मालवाहू वाहनाच्या मालकाला 2 हजार व वाहनचालकाला 2 हजार याप्रमाणे दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. *****

No comments: