08 July, 2025
खरीप २०२५ करिता प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू
शेतकऱ्यांनी ३१ जुलैपूर्वी पीक विमा काढावा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे आवाहन
हिंगोली, दि. ८ (जिमाका) : खरीप २०२५ हंगामासाठी हिंगोली जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून, विविध नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानापासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे यासाठी ३१ जुलैपूर्वी शेतक-यांनी पीक विमा काढून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत अधिसूचित क्षेत्रातील खरीप ज्वारी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस या पिकांसाठी
शेतकऱ्यांनी www.pmfby.gov.in या केंद्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवर किंवा नजीकच्या कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन अर्ज भरावा. अर्ज प्रक्रियेसाठी केंद्र शासनाने ४० रुपये मानधन निश्चित केले असून, त्याव्यतिरिक्त कोणतीही अतिरिक्त रक्कम सीएससी चालक मागत असल्यास १४४४७ या निशुल्क क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
*फसवणुकीच्या घटना टाळा :*
कोणत्याही शेतकऱ्याने दुसऱ्याच्या जमिनीवर, शासकीय जमीन, गायरान, मंदिर, देवस्थानावर बोगस पीक दाखवून विमा घेतल्यास अशा प्रकरणांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच फसवणूक करणाऱ्या अर्जदारांना पुढील ५ वर्षे कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.
खरीप हंगामातील पीक विमा काढण्यासाठी शेतक-याने अर्जासाठी अँग्रीस्टॅक नोंदणी, ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा सहभाग ऐच्छिक असून, ई-पीक पाहणी व प्रत्यक्ष पीक यात तफावत आढळल्यास विमा रद्द होऊ शकतो. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी ७/१२ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक व स्वयंघोषणा घेऊन अर्ज करावा. कर्जदार शेतकऱ्यांनी विमा नको असल्यास अर्ज करण्याच्या ७ दिवस आधी बँकेस लेखी कळवावे, असेही त्यांनी कळविले आहे.
हिंगोली जिल्ह्यासाठी
भारतीय कृषि विमा कंपनी, मुंबई ची नियुक्ती खरीप २०२५ व रब्बी २०२५-२६ हंगामासाठी करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी pikvima@alcofindia.com या ई-मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*जिल्ह्यातील तक्रार निवारण अधिकारी*
अधिकारी | तालुका | भ्रमणध्वनी |
शिवसंदीप रणखांब (हिंगोली) ८७६६४०३१७९, कंठाळू जाधव (कळमनुरी) ७५८८१५३१५०, सुनिल भिसे (वसमत) ७५८८०१८६६७, शिवप्रसाद संगेकर (औंढा नागनाथ) ८४०८८४०४८७, संदीप वळकुंडे (सेनगाव) ८९९९२३५४०१ असून, शेतकऱ्यांनी अंतिम तारखेची वाट न पाहता आपली पीक विमा प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी व अनावश्यक खर्च, फसवणूक व त्रास टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय पीक विमा समितीचे अध्यक्ष राहुल गुप्ता यांनी केले आहे.
*विमा संरक्षित रक्कम व हप्ता तपशील (रु./हे.):*
*पीक | संरक्षित रक्कम | शेतकऱ्याचा हप्ता*
ज्वारी | ₹33,000 | ₹82.50 | |
मूग | ₹26,000 | ₹65 | | उडीद | ₹25,000 | ₹62.50 | |
सोयाबीन | ₹58,000 | ₹1160 | |
सूर्यफूल | ₹43,000 | ₹430 | |
कापूस | ₹60,000 | ₹600 असा आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment