25 July, 2025

वसमत आयटीआय मध्ये विजय दिन साजरा

हिंगोली (जिमाका), दि. 25: कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून वसमत आयटीआयमध्ये दि. 24 जुलै, 2025 रोजी विजय दिवस साजरा करण्यात आला. या विजय दिवसाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे प्राचार्य एस. एल. कोंडावार हे होते, विजय दिवसानिमित्त मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख वक्ता म्हणून प्रा.डॉ.शशिकांत तोळमारे यांना आमंत्रित करण्यात आलेले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आयटीआयमधील आयएमसीचे सदस्य राजेश भालेराव, सुजित आंबेकर व शंतनु देशपांडे हे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रा. तोळमारे यांनी उपस्थितांना कारगील युद्धाबद्दल माहिती देऊन विजय दिवसाचे महत्त्व सांगितले. तसेच संस्थेचे प्राचार्य एस. एल. कोंडावार यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना विजय दिवसाचे महत्त्व सांगितले, तसेच संस्थेतील गटनिदेशक टी. जे. झाड, शिल्प निदेशक गणेश येमेवार, आर. एन. कानगुले, एन.एस. सबनवार, पी.व्ही वानखेडे, एस. आर. पडघन, मुख्य लिपिक एस.आर खूपसे, वरिष्ठ लिपिक श्रीमती आर.जे शहारे व कार्यालयीन कर्मचारी डी. व्ही साळवे, एन. एच वाहेवळ यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. ******

No comments: