17 July, 2025

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेच्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हतेचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर करावेत

हिंगोली (जिमाका), दि.17: शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेच्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यवसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिन्याच्या कालावधीत सादर करणे अनिवार्य आहे. विहित मुदतीत गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवारांने सादर केल्यानंतर त्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे कळविण्यात आले होते. त्यानुसार उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयास ई-मेल, पोस्ट अथवा हस्तपोचीने सादर करतांना शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षा-2025 परीक्षेचा नोंदणी क्रमांक व बैठक क्रमांक नमूद करावा किंवा https://mscepune.in/dtedola/TAIT2025InfoAppear.aspx या लिंकमध्ये माहिती भरुन विहित मुदतीत सादर करावी. जेणेकरुन शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षा-2025 मध्ये प्राप्त केलेल्या गुणांनुसार त्यांचे गुणपत्रक देण्यात येईल. गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील. तद्नंतर याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची सर्व उमेदवारांनी, विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. **

No comments: