19 July, 2025

वसमत आयटीआयमध्ये नामांकित कंपनीमार्फत कॅम्पस इंटरव्यू

हिंगोली (जिमाका), दि. 19 : वसमत येथील स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये आजी-माजी विद्यार्थ्यांसाठी भारतातील नामांकित व्हर्लपूल कंपनीला बोलावून कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन करण्यात आलेले होते. याप्रसंगी संस्थेचे प्राचार्य एस. एल. कोंडावार यांनी व्हर्लपूल कंपनीकडून आलेले कंपनीचे प्रतिनिधीचे स्वागत करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे मुलाखतीला सामोरे जाऊन या संधीचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले. कंपनीचे प्रतिनिधी श्री. कोल्हे यांनी कंपनीच्या धोरणाबद्दल माहिती सांगितली तर श्री. काळे यांनी निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणारे वेतन, सोयीसुविधा व इतर भत्ते याची माहिती दिली. त्यानंतर संस्थेतील एक वर्ष व दोन वर्ष व्यवसायाच्या द्वितीय वर्षातील एकूण 51 विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून घेऊन मुलाखती घेण्यात आल्या. याचा अंतिम निकाल कंपनीमध्ये जाऊन घोषित करण्यात येणार आहे. त्यामुळे संस्थेतील एकूण जवळपास 45 ते 50 विद्यार्थ्यांची निवड निश्चित आहे. या कॅम्पस इंटरव्यू दरम्यान संस्थेतील निदेशक जी. आर. कोरवार, जी. एन. येमेवार, आर. एन. कानगुले. एन. एस. सबनवार, एस. आर. पडघन, मुख्य लिपिक एस. आर. खूपसे, वरिष्ठ लिपिक श्रीमती आर. जे. शहारे, तसेच कार्यालयीन कर्मचारी ज्ञानेश्वर साळवे, नामदेव वाहेवळ व भालेराव यांनी सहकार्य केले. *****

No comments: