21 July, 2025

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध योजनेसाठी अर्ज करा

हिंगोली (जिमाका), दि.21 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या जिल्हा कार्यालय हिंगोली कार्यालयासाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजनेंतर्गत 90 व बीज भांडवल योजनेंतर्गत 90 कर्ज प्रकरणाचे तसेच थेट कर्ज योजनेंतर्गत 30 कर्ज प्रकरणाचे उद्दिष्ट आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील इच्छूक अर्जदाराने वरील योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑगस्ट, 2025 अखेर पर्यंत http://mahadisha.mpbcdc.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत. तसेच कार्यालयाशी संपर्क साधावा. अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, कोटेशन, प्रकल्प अहवाल, व्यवसायाचा जागेचा पुरावा, दोन पासपोर्ट साईज फोटो, व्यवसायाचे लायसन्स इत्यादी कागदपत्राच्या छायांकित प्रतीसह दोन प्रतीत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. हिंगोली यांनी केले आहे. *****

No comments: