23 July, 2025

खासगी आस्थापनांनी शी बॉक्स पोर्टलवर नोंदणी करावी

हिंगोली (जिमाका), दि. 23 : केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयामध्ये 10 किंवा 10 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असलेल्या खासगी आस्थापना, कंपनी, एमआयडीसी कंपनी, मॉल, रेस्टारेंट्स, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, दुकाने, बँक, खासगी उपक्रम/संस्था, इंटरप्रायजेस, अशासकीय संघटना, सोसायटी, ट्रस्ट, उत्पादक, पुरवठा, वितरण व विक्री यासह वाणिज्य, व्यावसायिक, शैक्षणिक, करमणूक, औद्योगिक, आरोग्य इत्यादी सेवा किंवा वित्तीय कामकाज पार पाडणारे युनिट किंवा सेवा पुरवठादार रुग्णालये, सुश्रृषालये, क्रीडा संस्था, प्रेक्षागृहे, क्रीडा संकुले तसेच ईतर खासगी आस्थापना इत्यादी ठिकाणी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. तसेच त्याबाबतची माहिती ही महिला बाल विकास मंत्रालय, भारत सरकारच्या 'शी बॉक्स' या पोर्टलवर अंतर्गत तक्रार समितीची नोंद करण्यासाठी http://shebox.wcd.gov.in या वेबसाईटवर जाऊन होम स्क्रीनवर दाखविल्याप्रमाणे प्रायवेट हेड ऑफिस रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करुन आवश्यक त्या सर्व माहितीचा तपशिल भरुन सबमिट या टॅबवर क्लिक करुन अंतर्गत तक्रार समितीची माहिती नोंदविणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. तसेच अधिनियमातील कलम 26 मध्ये नमूद केल्यानुसार "जर एखाद्या मालकाने (अ) अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली नाही, (ब) अधिनियमातील कलम 13, 14 किंवा 22 नुसार कार्यवाही केली नाही, (क) किंवा या कायद्यातील व नियमातील विविध तरतुदींचे व जबाबदाऱ्यांचे पालन न केल्यास मालकाला 50 हजार रुपयापर्यंत दंड होईल. तसेच हाच गुन्हा पुन्हा केल्यास आस्थापनेचा परवाना रद्द किंवा दुप्पट दंड अशी तरतूद आहे. जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करून अथवा यापूर्वी समिती गठित केली असल्यास त्याबाबतची नोंद लवकरात लवकर शी बॉक्स पोर्टलवर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, एस-7, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, हिंगोली-431513 ई-मेल पत्ता : dwandcdoh@gmail.com येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. **

No comments: