15 July, 2025
जागतिक लोकसंख्या दिन, सप्ताहात १९ स्त्रियांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यशस्वी
*जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी जिल्ह्यातील पहिले कुटुंब कल्याण शिबिर*
हिंगोली: (दि. १५ ) रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र सीरसम येथे कुटुंब कल्याण स्त्री शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घघाटन जागतिक लोकसंख्या दिन व सप्ताह निमित जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्जन डॉ. डी. व्ही. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरामध्ये 19 स्त्री शस्त्रक्रिया यशस्वीरित्या सर्जन डॉक्टर सावंत यांनी केल्या.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय बेंगाळ, प्रकाश बर्वे, शेख अनवर, मारोती सोलापुरे उपस्थित होते आरोग्य सहायक श्री. डुकरे, आरोग्य सहायिका श्रीमती कोलटेके , प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री. भालेराव, श्री. सोनटक्के श्रीमती गायकवाड व श्रीमती देवकते स्टाफ नर्स, श्री प्रदीप चव्हाण, शुभम बेंगाल व संजय जयस्वाल तसेच अंजुम शेख व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आशा स्वयंसेविका यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment