21 July, 2025

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत केंद्रवती अर्थसंकल्प योजनेचे ऑनलाईन अर्ज सादर करण्यास 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

हिंगोली (जिमाका), दि.21 : केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युक्लिअस बजेट) योजनेंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षातील मंजूर आराखड्यातील योजना नुसार परभणी व हिंगोली जिल्ह्यातील योजनांसाठी इच्छुक सर्व आदिवासी लाभार्थ्याकडून शासनाच्या https://www.nbtribal.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्यास दिनांक 31 जुलै, 2025 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभार्थ्यांनी https://www.nbtribal.in या संकेतस्थळावरील योजनाचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयात ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी सुनिल बारसे यांनी केले आहे. *****

No comments: