16 July, 2025

जिल्ह्यातील मागासवर्गीय पात्र विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहासाठी अर्ज करावेत

हिंगोली (जिमाका), दि. 16 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय,हिंगोली यांच्या नियंत्रणाखाली हिंगोली जिल्ह्यात 4 मुलींचे व 4 मुलांचे शासकीय वसतिगृहे असे एकूण हिंगोली जिल्ह्यात 8 शासकीय वसतिगृहे कार्यरत असून सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात हिंगोली जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी वसतिगृहात प्रवेश करण्यासाठी दिनांक 11 जून 2025 रोजी पासून ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे बंद असून ऑनलाईन पध्दतीने https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज स्वीकारणे सुरु झालेले आहे. वसतिगृहाची नावे : 1) गृहपाल, मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागास मुलींचे शासकिय वसतिगृह,डॉ.बा.आं.सामाजिक न्याय भवन,हिंगोली. 2) गृहपाल, नवीन मागासवर्गीय मुलींचे शासकिय वसतिगृह, डॉ.बा.आं.सामाजिक न्याय भवन,हिंगोली 3) गृहपाल, मागासवर्गीय मुलींचे शासकिय वसतिगृह, लमाणदेव मंदिराच्या समोर, इंदिरा नगर, कळमनुरी 4) गृहपाल, मागासवर्गीय मुलींचे शासकिय वसतिगृह, बेले यांची इमारत, बस स्टँण्ड समोर, वसमत 5) गृहपाल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकिय वसतिगृह,एस.आर.पी.एफ.कॅम्पच्या पाठीमागे,हिंगोली 6) गृहपाल,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकिय वसतिगृह,कृषी उ.बाजार समितीच्या पाठीमागे,कळमनुरी 7) गृहपाल,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकिय वसतिगृह,भोरीपगांव रोड, वसमत 8) गृहपाल, मागासवर्गीय मुलांचे शासकिय वसतिगृह,तालुका रुग्णालयाच्या शेजारी, गोरेगांव रोड, सेनगांव येथे आहेत. हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त शालेय मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 17 जुलै 2025 ही प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. तर इयत्ता 11 वी व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम (पदवीसाठी प्रवेशीत) मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी दिनांक 23 जुलै 2025 पर्यंतच वरील ऑनलाईन संकेतस्थळावर अर्ज करावेत. ऑनलाईन संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करतेवेळी वसतिगृहाचे नाव नमुद करुन मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. तसेच ऑनलाईन भरण्यात आलेल्या अर्जाची प्रिंट काढून त्यासोबत आवश्यक कागदपत्रासह आपला अर्ज आपण ज्या वसतिगृहासाठी अर्ज सादर केला त्या वसतिगृहात प्रत्यक्ष उपस्थित राहून अर्जाची प्रत सादर करावे, हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त मागासवर्गीय पात्र विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहासाठी अर्ज करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,हिंगोली यांनी केले आहे. ******

No comments: