03 July, 2025
अल्पसंख्यांक समाजातील तरुणांसाठी निवासी पोलिस शिपाई भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम • 10 जुलैपर्यंत अर्ज सादर करावेत
हिंगोली(जिमाका), दि.03 : जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील तरुणांसाठी निवासी पोलीस शिपाई भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सन 2025-26 अंतर्गत अध्यक्ष/सचिव, शिवछत्रपती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पाडी बु. द्वारा संचालित श्री. गणेश मिल्ट्री फाऊंडेशन व भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, टोकाई, ता. वसमत. जि. हिंगोली या संस्थेमार्फत 03 महिन्याचे (90 दिवस) निवासी प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे. इच्छुक अल्पसंख्यांक उमेदवारांनी शिवछत्रपती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पार्डी बु. द्वारा संचालित श्री. गणेश मिल्ट्री फाऊंडेशन व भरतीपूर्वी प्रशिक्षण केंद्र, टोकाई, ता. वसमत, जि. हिंगोली (संपर्क - कृष्णा बागल मो. नं. 9730978864, 8668493865) या संस्थेच्या पत्त्यावर दि. 10 जुलै, 2025 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
उमेदवारांच्या निवडीसाठी अटी व शर्ती : उमेदवार मुस्लीम, ख्रिश्चन, बौध्द, शीख, पारसी, जैन आणि ज्यू या अल्पसंख्यांक समाजातील असावा. ज्या उमेदवारांनी या योजनेचा लाभ यापूर्वी घेतला आहे असे उमेदवार वगळून इतर अल्पसंख्याक उमेदवारांनी उपरोक्त पत्त्यावर दि. 17 डिसेंबर, 2021 च्या शासन निर्णयातील प्रपत्र क प्रमाणे अर्ज करावेत. प्रशिक्षणार्थीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे. याबाबत उमेदवाराने स्वंयघोषित प्रतिज्ञापत्र प्रशिक्षण संस्थेकडे सादर करावे. यापूर्वी उमेदवाराने शासन अनुदानित संस्थेकडुन पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण घेतले नसावे. उमेदवाराची उंची पुरुष 165 से. मी. व महिला 155 से. मी., छाती पुरुष 79 से. मी. (फुगवून 84 से.मी.) असावी. उमेदवार इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावा. उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता, आधार कार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांच्या सत्यप्रती अर्जासोबत देणे आवश्यक राहील. उमेदवार शारीरिकदृष्ट्या निरोगी व सक्षम असावा. या योजनेत उमेदवाराने एकदा प्रशिक्षण घेतल्यानंतर पुन्हा प्रशिक्षण घेता येणार नाही.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment