12 July, 2025
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून कृषि विज्ञान केंद्राचा आढावा
• कृषी संशोधन, जैविक निविष्ठा, पिक प्रात्यक्षिक आणि विविध उपक्रमांचा घेतला आढावा
हिंगोली, दि.१२(जिमाका):
भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली आणि संत नामदेव सेवाभावी संस्था, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने संचालित कृषि विज्ञान केंद्र तोंडापूर येथे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नुकतीच भेट दिली. या भेटीत त्यांनी केंद्रात राबवण्यात येणाऱ्या विविध कृषि विषयक उपक्रमांचा आणि सुविधांचा सखोल आढावा घेतला.
यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. पी. पी. शेळके उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी हळद, सोयाबीन आणि हरभरा यांसारख्या पिकांच्या बीजोत्पादन व विजय उत्पादन कार्यक्रमांचे कौतुक करत, हवामान बदल, पोषण सल्ला आणि शेती विकास या क्षेत्रात कृषि वे ज्ञान केंद्रासोबत संयुक्तपणे कार्य करण्याची तयारी दर्शविली.
संत नामदेव सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अँड. शिवाजीराव माने यांनी काढणीपश्चात तंत्रज्ञान, हळदीच्या जातींचा प्रचार, शेती यांत्रिकीकरण व जल–मृदा व्यवस्थापन यावर भर देण्याचे आवाहन केले.
यावेळी महेंद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, तालुका कृषी अधिकारी श्री.जाधव उपस्थित होते.
भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी माती परीक्षण, बायोएजंट्स उत्पादन, जैव–नियंत्रण उत्पादने, अन्न तंत्रज्ञान प्रात्यक्षिके, गिर गाय युनिट, स्फूर्ती बहुउत्पादन समूह, सामायिक यंत्रसामग्री व मत्स्यपालन युनिटचा देखील आढावा घेतला.
कार्यक्रमात केंद्रातील सर्व विषयतज्ज्ञ राजेश भालेराव, अनिल ओळंबे, अजयकुमार सुगावे, रोहिणी शिंदे, डॉ. अतुल मुराई, साईनाथ खरात, डॉ. कैलास गित्ते, विजय ठाकरे, शिवलिंग लिंगे यांनी उपस्थितांना आपल्या विभागातील उपक्रमांची माहिती दिली.
डॉ. शेळके यांनी केंद्राचे उद्दिष्टे, कार्यपद्धती, शेतीतील प्रात्यक्षिके, प्रशिक्षण कार्यशाळा तसेच जैविक निविष्ठांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल ओळंबे यांनी केले. या प्रसंगी मनीषा मुंगल, ओमप्रकाश गुडेवार, गुलाबराव सूर्यवंशी, मारुती कदम, संतोष हाणवते, प्रेमदास जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment