28 July, 2025

युवकांनी भारत मातेच्या सेवेसाठी योगदान द्यावे -अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे

• कारगिल विजय दिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली हिंगोली (जिमाका), दि. 28: युवकांनी सैन्यात भरती होऊन भारत मातेच्या सेवेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी केले. कारगील विजय दिवस निमित्त शनिवार (ता. 26) रोजी अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे व उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शहिदांना अभिवादन केले, तसेच कारगील युद्धात ज्या सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्या सर्व सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करीत कारगील विजय दिवसानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना अपर जिल्हाधिकारी श्री. कांबळे म्हणाले, कारगील युद्धात ज्या सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्व सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कारगिल दिवस साजरा करण्यात येत असल्याचे सांगून माजी सैनिकांच्या अडीअडचणी जाणून घेत त्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर असल्याचे सांगितले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात हिंगोली जिल्ह्यातील माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सय्यद मीर, सुभेदार मेजर पुंडगे भीमराव, सुभेदार नामदेव मस्के, बाबूराव जांबुतकर, पंडित हाके, पुंडलिक महाराज, सुर्यकुमार बळखंडे यांच्यासह युद्ध वीर मरण आलेल्या सैनिकांच्या वीर नारी, वीर माता यांचा अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण संघटक कॅप्टन मुकाडे, खराटे संघपाल, कडुजी टापरे, सिताराम फुपाटे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. *****

No comments: