28 July, 2025

वसमत आयटीआयमध्ये तासिका तत्त्वावर पद भरतीसाठी शनिवारी मुलाखत

हिंगोली (जिमाका), दि. 28 : वसमत येथील स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल शासकीय प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये सोलार टेक्निशियन इलेक्ट्रिकल या नवीन ट्रेडच्या दोन युनिटला शासनाकडून मान्यता मिळालेली असल्याने या ट्रेडला सन 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश करावयाचे आहेत. त्यासाठी या ट्रेडसाठी तासिका तत्त्वावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात 11 महिन्याकरिता निदेशक नियुक्तीसाठी संस्थेमध्ये शनिवार, दिनांक 2 ऑगस्ट, 2025 रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या पदाच्या पात्रतेसाठी www.dget.gov.in व www.dvet.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि परिसरातील सर्व पात्रताधारक उमेदवारांनी आपला बायोडाटा व अर्ज 2 ऑगस्ट 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत जमा करावेत. तसेच त्याच दिवशी पात्र पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस. एल. कोंडावार यांनी केले आहे. *****

No comments: